"सेटवर काजोल वगैरे वेगळेच बसायचे...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:21 IST2025-12-08T18:21:20+5:302025-12-08T18:21:57+5:30
अजय देवगण आणि काजोलच्या 'या' सिनेमात दिसलेली मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?

"सेटवर काजोल वगैरे वेगळेच बसायचे...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा
'होणार सून मी ह्या घरची','मन उडू उडू झालं' अशा अनेक मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर. गेल्या अनेक वर्षांपासून ती मराठी इंडस्ट्रीत सक्रीय आहे. पूर्णिमा ही दिग्गज अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची सून आहे. पूर्णिमाने करिअरच्या सुरुवातीला हिंदीत काम केलं होतं. अजय देवगण-काजोलच्या 'प्यार तो होना ही था'मध्ये ती दिसली होती. यात ती अजय देवगणच्या बहिणीच्या भूमिकेत होती. त्यावेळी अजय आणि काजोल सेटवर कसे असायचे यावर पूर्णिमा नुकतंच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.
टेली गप्पाला दिलेल्या मुलाखतीत पूर्णिमा तळवलकर म्हणाली, "आम्ही मेहबूब स्टुडिओत सात दिवस शूट करत होतो. एकाच कपड्यात हे शूट सुरु होतं. त्यामुळे खूप कंटाळा आला होता. हा माझा पहिलाच हिंदी सिनेमा होता. तेव्हा मी अगदीच २२-२३ वर्षांची होते. सेटवर ओळख असेल तरच लोक बोलायचे. दुसरं म्हणजे सगळ्यांना स्वतंत्र व्हॅनिटी होत्या. त्यामुळे एकमेकांशी काहीच बाँडिंग व्हायचं नाही. मी हे काम करु शकेन की नाही अशी मला भीतीच वाटायची."
अजय-काजोलसोबत बोलणं व्हायचं का? यावर ती म्हणाली, "काहीच नाही..शॉट संपला की प्रत्येक जण आपापल्या व्हॅनिटीमध्ये जायचे. नंतर चंदीगढला शूटसाठी गेलो होतो. तिथे काजोल वगैरे तर वेगळेच बसायचे. पण बाकी आम्ही रिमा लागू आणि इतर कलाकार आम्ही एकत्र बसायचो. आमचं एक कुटुंबच झालं होतं. शूट संपल्यानंतर एकमेकांच्या रुममध्ये जाऊन आम्ही मजा करायचो."