पुलकितने सलमानच्या बहिणीला का दिलेला घटस्फोट? कोर्टाबाहेर फोटोग्राफरला केली होती मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 10:56 IST2024-03-14T10:52:34+5:302024-03-14T10:56:13+5:30

कोर्टाबाहेर पुलकीतने रागारागात फोटोग्राफरला मारलंही होतं. काय होतं नेमकं प्रकरण?

Pulkit Samrat and Shweta Rohira was divorced what was the reason actor also hit photographer outside court | पुलकितने सलमानच्या बहिणीला का दिलेला घटस्फोट? कोर्टाबाहेर फोटोग्राफरला केली होती मारहाण

पुलकितने सलमानच्या बहिणीला का दिलेला घटस्फोट? कोर्टाबाहेर फोटोग्राफरला केली होती मारहाण

'सनम रे' फेम अभिनेता पुलकीत सम्राट (Pulkit Samrat) दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहे. लाँग टाईम गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री क्रिती खरबंदासोबत (Kriti Kharbanda) तो उद्या लग्न करणार आहे. दिल्ली येथे दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. पुलकीतने याआधी सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी (Shweta Rohira) लग्न केलं होतं. इतकंच नाही तर कोर्टाबाहेर पुलकीतने रागारागात फोटोग्राफरला मारलंही होतं. काय होतं नेमकं प्रकरण?

सलमान खानची अगदी जवळची आणि मानलेली बहीण श्वेता रोहिरा आणि पुलकीत सम्राटने 2014 साली लग्नगाठ बांधली होती. श्वेताने दावा केला होता की खरंतर दोघंही याआधीच लग्नबंधनात अडकले होते. अधिकृतरित्या केवळ त्यांनी आता लग्न केलं होतं. यानंतर २०१६ साली पुलकीत सम्राट आणि यामी गौतम यांचा 'सनम रे' सिनेमा रिलीज झाला. यावेळी दोघांच्या अफेअरचीही चर्चा झाली. तेव्हा श्वेता रोहिराने गर्भपाताचा खुलासा केला आणि  यामी गौतममुळेच आमचा घटस्फोट होत असल्याचं जाहीर केलं. तर दुसरीकडे पुलकीतने यामीचा बचाव करत तिला यामध्ये दोषी ठरवू नका असं सांगितलं. श्वेता रोहिरा पुलकीत विषयी म्हणाली होती की,'पुलकीतला त्याचं कुटुंब जास्त प्रिय आहे. मी त्याच्या कुटुंबासाठी सगळं केलं. त्याला हवं ते दिलं. म्हणूनच त्याने घटस्फोटाची मागणी केली आणि मी तीही पूर्ण केली.' तर पुलकीत म्हणाला, 'गर्भपाताविषयी ऐकून मला धक्का बसला. ही आमची खासगी गोष्ट आहे. यात यामीचा काहीच संबंध नाही.'

पुलकीत आणि श्वेता रोहिराच्या घटस्फोटाचं प्रकरण फॅमिली कोर्टात सुरु असताना कोर्टाबाहेर राडा झाला होता. सलमानच्या मानलेल्या बहिणीचं हे प्रकरण असल्याने अनेक फोटोग्राफर्स कोर्टाबाहेर हजर होते. स्वत:वरील आरोप ऐकून पुलकीतचा राग अनावर झाला होता आणि त्याने एका फोटोग्राफरला कोर्टाबाहेरच मारहाण केली होती. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: Pulkit Samrat and Shweta Rohira was divorced what was the reason actor also hit photographer outside court