पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 14:39 IST2024-01-30T14:38:53+5:302024-01-30T14:39:38+5:30
दोघांनी अंगठी फ्लॉन्ट करत फोटो काढले आहेत.

पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल
बॉलिवूडच्या फेवरेट जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा(Kriti Kharbanda). दोघंही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तर गेल्या काही काळापासून ते लिव्ह इन मध्येही राहत आहेत. या क्युट कपलचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर रिया लुथराच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो पुलकित-कृतीच्या रोका सेरेमनीचा असल्याचं दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद बघायला मिळत आहे. पुलकितने कृतीला मिठीत घेतलं असून त्यांच्या बोटातील अंगठीकडे चाहत्यांचं लक्ष गेलं. दोघंही आपापली रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.पुलकितने हाच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचीच चर्चा सुरु झाली. चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र अद्याप दोघांकडूनही कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही. तसंच त्यांनी ऑफिशियली सोशल मीडियावर फोटोही शेअर केलेले नाहीत.
पुलकित आणि कृतीचे एकत्र राहत असल्याने अनेकदा फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच कृतीने आलिशान कार खरेदी केली तेव्हाही पुलकित तिच्यासोबत दिसला. त्यांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. फिल्मच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
पुलकीतचं आधी एकदा लग्न झालं आहे. सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत त्याने २०१४ साली लग्नगाठ बांधली होती.मात्र त्यांचा एका वर्षातच घटस्फोट झाला. आता पुलकित पुन्हा बोहल्यावर चढायला तयार आहे. पुलकीत आणि कृतीमध्ये 7 वर्षांचं अंतर आहे.