फिटनेसमध्ये 'हा' अभिनेता देतोय अनिल कपूरला टक्कर, वयाच्या ५३ वर्षीही दिसतो प्रचंड हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:23 IST2026-02-21T12:23:00+5:302026-02-21T12:23:46+5:30
Bollwood actor: २००१ साली प्रदर्शित झालेला 'तुम बिन' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमाच्या माध्यमातून प्रियांशू तुफान लोकप्रिय झाले.

फिटनेसमध्ये 'हा' अभिनेता देतोय अनिल कपूरला टक्कर, वयाच्या ५३ वर्षीही दिसतो प्रचंड हँडसम
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पहिल्याच सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. यात काही कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात ते स्थान राखून आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. यातलाच एक अभिनेता म्हणजे प्रियांशू चटर्जी. पहिल्याच सिनेमातून रातोरात स्टार झालेले प्रियांशू यांची लोकप्रियता आज सुद्धा जराही कमी झालेली नाही.
२००१ साली प्रदर्शित झालेला 'तुम बिन' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. हा सिनेमा त्याकाळी बराच गाजला. विशेष म्हणजे त्यातील गाणी आजही लोकं आवडीने ऐकतात. या सिनेमाच्या माध्यमातून प्रियांशू तुफान लोकप्रिय झाले. या सिनेमानंतर त्यांनी अनेक गाजलेले सिनेमा दिले. मात्र, ठराविक काळानंतर त्यांचं इंडस्ट्रीतील वावर कमी झाला. त्यामुळे प्रियांशू आता काय करतात, कसे दिसतात असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.
प्रियांशू आज ५३ वर्षांचे झाले असून फिटनेसच्या बाबतीत ते अभिनेता अनिल कपूरला टक्कर देतांना दिसतात. प्रियांशू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यामुळे नवनवीन पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. प्रियांशू फिटनेसफ्रिक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडीओ, फोटोही चाहत्यांसोबत शेअर करतात.
दरम्यान, वयाच्या ५३ व्या वर्षी फिटनेसफ्रिक असलेल्या या अभिनेत्याने 'आपको पहले भी कहीं देखा है', 'दिल का रिश्ता', 'पिंजर', 'जूली','मदहोशी','भूतनाथ','12वीं फेल' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांनी बंगाली सिनेमांमध्येही नशीब आजमावलं आहे.