"माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, पण..."; लेकीच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रावर कोणाचा दबाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:10 IST2026-02-26T15:08:18+5:302026-02-26T15:10:04+5:30
प्रियांका आणि निक जोनास यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे, मालती मेरीचे स्वागत केले होते. मात्र, मुलीच्या जन्माची बातमी जाहीर करण्यासाठी प्रियांकावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.

"माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, पण..."; लेकीच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी प्रियंका चोप्रावर कोणाचा दबाव?
जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांका आणि निक जोनास यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे, मालती मेरीचे स्वागत केले होते. मात्र, मुलीच्या जन्माची बातमी जाहीर करण्यासाठी प्रियांकावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.
काय घडलं होतं नक्की?
प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मालती मेरीचा जन्म Premature झाला होता आणि तिला अनेक दिवस NICU मध्ये ठेवावे लागले होते. अशा अत्यंत कठीण आणि भावनिक प्रसंगात प्रियंका आणि निक आपली प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मीडियाला त्यांच्या मुलीच्या जन्माची बातमी आधीच मिळवली होती.
प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, संबंधित मीडियाने या वृत्ताची पुष्टी करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. जर प्रियांकाने स्वतःहून ही घोषणा केली नसती, तर ते प्रकाशन ही बातमी त्यांच्या पद्धतीने प्रसिद्ध करणार होते. "माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना, मला ही बातमी जगाला सांगण्यासाठी भाग पाडले गेले. आम्हाला किमान काही दिवस शांतता हवी होती, पण अशी गोष्ट घडल्याने तो अधिकार आम्हाला मिळाला नाही," अशा भावना प्रियांकाने व्यक्त केल्या. अशाप्रकारे प्रियांकाने हा खुलासा केला.
प्रियांकाचा हा खुलासा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संबंधित मीडियावर संताप व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात आणि विशेषतः मुलांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता दाखवणे चुकीचे असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.