प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:19 PM2023-10-26T13:19:27+5:302023-10-26T13:20:35+5:30

बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात प्रीती झिंटाने मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केलं आहे.

Preity Zinta buys luxury apartment in Mumbai's Pali Hill area for Rs 17.01 crore | प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत एकूण तुम्ही थक्क व्हालं

प्रिती झिंटाला बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' म्हणूनही ओळखलं जातं. 90 च्या दशकात प्रिती झिंटाने रुपेरी पडद्यावर राज्य केलं आहे. या अभिनेत्रीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.  प्रिती झिंटाचा सध्या चित्रपटांशी फारसा संबंध नसला तरी ती खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. नुकतंच प्रिती झिंटाने मुंबईत आलिशान घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल परिसरातील इमारतीच्या 11व्या मजल्यावर हे घर आहे. या घराची एकूण किंमत सुमारे 17.01 कोटी इतकी असल्याची माहिती आहे. या आलिशान घराचं क्षेत्रफळ 1474 चौरस फूट आहे.  

या वर्षात  सोनाक्षी सिन्हा ते करण कुंद्रा, अश्नूर कौर आणि मनीषा राणी यांनी अलीकडेच मुंबई शहरात नवीन घरे खरेदी केली आहेत. आता या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटाच्या नावाचाही समावेश झाला आहे. प्रितीने मुंबईत घर खरेदी केल्याने अभिनेत्री लवकरच मुंबईत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रिती झिंटाने 2016 मध्ये बिझनेसमन जीन गुडइनफशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. 2021 मध्ये प्रीती आणि गुडनफ यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.  फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, प्रीतीने 1998 मध्ये दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'दिल से' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या अभिनेत्रीने पडद्यावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यानंतर प्रीती झिंटा 2018 मध्ये 'भैयाजी-सुपरहिट' या अॅक्शन-कॉमेडी जॉनर चित्रपटातही दिसली होती.
 

Web Title: Preity Zinta buys luxury apartment in Mumbai's Pali Hill area for Rs 17.01 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.