त्यांचा खिसा रिकामा आहे कारण...; PM मोदींवरील टिप्पणी प्रकाश राज यांना पडली भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 09:30 IST2023-09-20T09:08:45+5:302023-09-20T09:30:35+5:30

प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो ट्वीट केला आहे.

prakash raj tweets on PM Narendra Modi asking is PM s brain is empty twitter users trolled him | त्यांचा खिसा रिकामा आहे कारण...; PM मोदींवरील टिप्पणी प्रकाश राज यांना पडली भारी

त्यांचा खिसा रिकामा आहे कारण...; PM मोदींवरील टिप्पणी प्रकाश राज यांना पडली भारी

'सिंघम' फेम साऊथ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) नेहमी त्यांच्या ट्वीटमुळे ट्रोल होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तर त्यांना प्रचंड राग असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून दिसून येतं. आधी चंद्रयानावरुन केलेल्या ट्वीटनंतर ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते तर आता त्यांनी थेट पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. यावरुन मोदी समर्थक आणि मोदी विरोधक कमेंट्स मध्ये भिडले आहेत.

काय आहे प्रकाश राज यांचं ट्वीट?

प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये मोदींच्या एका हातात फाईल आहे तर त्यांचा दुसरा हात खिशात आहे. 'नेमकं रिकामं काय आहे?', अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे. त्यातील एक शब्द नेटिझन्सना चांगलाच खटकलाय आणि त्यावरून त्यांनी प्रकाश राज यांना धारेवर धरलंय. 

'त्यांचा खिसा रिकामा आहे कारण त्यांनी 2014 पासून तुमच्या मास्टरसारखे घोटाळे केले नाहीत.' असा टोला एका युझरने मारला आहे. 'कदाचित तुमच्या भविष्यासारखंच रिकामं' अशी खोचक कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी फोल्डर रिकामं असल्याचं नमूद केलंय.

भारताच्या 'चंद्रयान 3' मोहिमेवेळीही प्रकाश राज यांनी हातात चहाची किटली असलेल्या कार्टुनचा फोटो ट्वीट केला होता. चंद्रावरुन घेतलेला पहिला फोटो असं त्यांनी लिहिलं होतं. त्या ट्वीटवरुन प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं होतं.

Web Title: prakash raj tweets on PM Narendra Modi asking is PM s brain is empty twitter users trolled him