३९ व्या वर्षी लोकप्रिय गायक पुन्हा झालाय बाबा; मुलाचं ठेवलंय 'हे' खास नाव, ३ वर्षांपूर्वी नवजात बाळाला गमावलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:38 IST2026-01-25T17:24:45+5:302026-01-25T17:38:25+5:30
तीन वर्षांपूर्वी गायकाने आपल्या नवजात बाळाला गमावलं होतं. आता या जोडप्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला आहे.

३९ व्या वर्षी लोकप्रिय गायक पुन्हा झालाय बाबा; मुलाचं ठेवलंय 'हे' खास नाव, ३ वर्षांपूर्वी नवजात बाळाला गमावलं होतं
लोकप्रिय पंजाबी गायक आणि संगीतकार बी प्राक (B Praak) याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा बच्चन यांना मुलगा झाला आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या नवजात बाळाला गमावल्यानंतर या जोडप्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या मुलाचे नावही जाहीर केले आहे.
बी प्राकने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव 'द्विज' असे ठेवले आहे. त्याने मुलाच्या नावाचा फोटो शेअर करत , "आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश आला आहे. वाहेगुरुंच्या कृपेने आम्हाला मुलगा झाला आहे."
दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यामुळे हे सुखद क्षण बी प्राक आणि मीरा यांच्यासाठी अत्यंत भावूक आहेत. २०२२ मध्ये बी प्राकच्या दुसऱ्या मुलाचा जन्मानंतर लगेचच मृत्यू झाला होता. त्या घटनेमुळे गायक आणि त्याची पत्नी पूर्णपणे कोलमडून गेला होता. त्याने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या त्या बाळाला गमावल्याचे दुःख व्यक्त केले होते. आता 'अदब'च्या जन्मानंतर हे जोडपे स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे.
बी प्राकने ही बातमी शेअर करताच मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गायक एमी विर्क, हार्डी संधू, जस्सी गिल आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे. चाहत्यांनीही "बाळाला आणि आईला उत्तम आरोग्य लाभो" अशा प्रार्थना केल्या आहेत. बी प्राक सध्या त्याच्या संगीतामुळे यशाच्या शिखरावर आहे. 'तेरी मिट्टी', 'फिलहाल', 'सारी दुनिया जला देंगे' आणि 'सडी गली' यांसारख्या गाण्यांनी त्याने संपूर्ण देशात ओळख निर्माण केली आहे.