Pooja Batra : आधीपेक्षाही बोल्ड झालं बॉलिवूडचं हे कपल, ४६ वर्षांच्या पूजा बत्राने पतीसोबत दिल्या किलर पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 16:45 IST2023-03-28T16:45:17+5:302023-03-28T16:45:49+5:30
Pooja Batra Photoshoot With Navabshah: पूजाने पती नवाब शाहसोबत टू पीस बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. ४६ वर्षांच्या पूजाचा हा बोल्ड अंदाज पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

Pooja Batra : आधीपेक्षाही बोल्ड झालं बॉलिवूडचं हे कपल, ४६ वर्षांच्या पूजा बत्राने पतीसोबत दिल्या किलर पोझ
Pooja Batra Photoshoot With Navabshah: एकेकाळी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी पूजा बत्रा (Pooja Batra) आता इंडस्ट्रीतून कायमची गायब झाली आहे. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. आपल्या फिटनेस व हॉटनेसमुळे ती सतत चर्चेत असते. आता पूजाने पती नवाब शाहसोबत टू पीस बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. ४६ वर्षांच्या पूजाचा हा बोल्ड अंदाज पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अभिनेता नवाब शाह आणि अभिनेत्री पूजा बत्रा २०१९ साली लग्न बंधनात अडकले होते. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. लग्नाआधी अनेक वर्षे पूजा नवाबला डेट करत होती.
पूजाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला होता. अर्थात लग्नाच्या नऊ वर्षांनंतर पूजाचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पूजाने पुन्हा कमबॅकचा प्रयत्न केला. पण तिला यश लाभलं नाही. एकेकाळी पूजा बत्रा तिच्या अफेअरमुळे चर्चेत होती. पूजाचे अभिनेता अक्षय कुमारसोबतचं अफेअर देखील चांगलंच गाजलं होतं. पूजाच्या मॉडलिंगच्या दिवसांपासून ती अक्षयला ओळखत होती. आजही पूजा आणि अक्षय यांच्यातील मैत्री कायम आहे.
पूजा बत्रा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. हसीना मान जायेगी, भाई आणि विरासत हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले होते. अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटातही पूजा दिसली होती. तिचा पती नवाब शाह हा सुद्धा एक अभिनेता आहे. नवाब शाहने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाग मिल्खा भाग, दिलवाले, डॉन, टायगर जिंदा है, पानिपत, दबंग ३ अशा अनेक सिनेमात तो दिसला. नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.