मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:18 IST2026-04-04T14:17:33+5:302026-04-04T14:18:29+5:30

मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेत्री पोलिसांच्या गाडीतून उतरली असून तिच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत.

Police arrest Mrunal Thakur video goes viral on dacoit movie promotion | मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण?

मृणाल ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, काय आहे नेमकं प्रकरण?

मराठीसह सध्या बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्री गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर.मृणाल ठाकूरचा (mrunal thakur) एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेत्री पोलिसांच्या गाडीतून उतरली असून तिच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून मृणालचे चाहते चांगलेच थक्क झाले आहेत. काय घडलंय नेमकं? मृणालला का केलीये अटक? जाणून घ्या सविस्तर 

मृणालला खरंच अटक झाली?

समोर आलेल्या व्हिडीओत दिसतं की रस्त्यावर पोलिसांची गाडी थांबलेली दिसते. त्या गाडीचा दरवाजा उघडला जातो. त्यातून मृणाल ठाकूर बाहेर पडते. तिने काळ्या रंगाची साडी परिधान केलेली असते. तिच्या हातात बेड्या असतात. मागून पोलीस उतरतात. मृणालसह या बेडीत अभिनेता अनुराग कश्यप अडकलेला असतो. एकूणच मृणालला खरंच अटक झाली नसून ती आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेली दिसते. मृणालच्या मागून अभिनेता आदिवी शेषही पोलिसांच्या गाडीतून उतरतो. मृणालचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.




मृणाल आगामी 'डकैत' सिनेमाचं प्रमोशनसाठी आलेली दिसते. या सिनेमाबद्दल सांगायचं तर, या सिनेमात मृणालसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवी शेष मुख्य भूमिकेत असून, ही एक अ‍ॅक्शन-पॅक्ड रिव्हेंज ड्रामा कथा असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. या सिनेमात अनुराग कश्यपही अभिनय करताना दिसणार आहे. सर्वांना मृणालच्या या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे. 'डकैत' हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत एकाच वेळी शूट करण्यात आला असून तो १० एप्रिल २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : क्या मृणाल ठाकुर गिरफ्तार? वायरल वीडियो में फिल्म प्रमोशन का खुलासा।

Web Summary : मृणाल ठाकुर की 'गिरफ्तारी' का वीडियो वायरल हुआ। यह उनकी आगामी फिल्म 'डकैत' के लिए एक प्रमोशनल स्टंट था, जिसमें अदिवी शेष और अनुराग कश्यप हैं। यह एक्शन ड्रामा 10 अप्रैल, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Mrunal Thakur 'arrested'? Viral video reveals movie promotion stunt.

Web Summary : Mrunal Thakur's video of being 'arrested' went viral. It was a promotional stunt for her upcoming movie 'Dacoit', starring Adivi Sesh and Anurag Kashyap. The action drama releases on April 10, 2026.