PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 02:15 PM2022-09-17T14:15:05+5:302022-09-17T14:29:58+5:30

'''तुमची दृष्टी, तुमची जिव्हाळा आणि तुमची काम करण्याची क्षमता. या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात.नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्य, आनंद आणि पुढील वर्ष उज्ज्वल जावो हीच सदिच्छा.''

PM Narendra Modi B'Day : Pillar of the country! From Karan Johar to Akshay Kumar, Bollywood celebrities congratulate the Prime Minister | PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा

PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा

googlenewsNext

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून ते 72 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देश आणि जगभरातील सर्वच नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याचा वाढदिवस ट्विटरवर ट्रेंड करत आहे. दरम्यान, नेत्यांबरोबरच बॉलिवूड सेलिब्रेटी ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अनुमप खेर यांनी दिल्या शुभेच्छा
अनुमप खेर यांनी ट्विट करत पंतप्रधानांसाठी लिहिले आहे की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही देशवासियांसाठी रात्रंदिवस करत असलेले कष्ट प्रेरणादायी आहेत. माझ्या आईने तुमच्या रक्षणासाठी पाठवलेली रुद्राक्षाची जपमाळ तुम्ही ज्या श्रद्धेने स्वीकारली होती ते आम्हाला सदैव स्मरणात राहील. जय हो. जय हिंद.'

अक्षय कुमारचं ट्विट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'तुमची दृष्टी, तुमची जिव्हाळा आणि तुमची काम करण्याची क्षमता. या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्य, आनंद आणि पुढील वर्ष उज्ज्वल जावो हीच सदिच्छा.

करण जोहरनंही दिल्या शुभेच्छा
आपल्या देशाच्या सर्वात मजबूत आधारस्तंभ, आपल्या देशाचं नाव जगाच्या नकाशावर उमटवणाऱ्या नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अजय देवगण शुभेच्छा
अजय देवगणने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, 'माननीय नरेंद्र मोदी जी, तुमचे नेतृत्व मला प्रेरणा देते, तुमचे उत्तम आरोग्य आणि येत्या वर्षासाठी शुभेच्छा.'

कंगनाने दिल्या शुभेच्छा
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिले- 'हॅपी बर्थडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी'. कंगनाने पुढे लिहिले - लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास किती अविश्वसनीय आहे. कंगनाने पुढे लिहिले- 'आम्ही तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो, पण राम, कृष्णासारखे, गांधीसारखे तुम्ही अमर आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार म्हणतो....'

रितेश देशमुखचं ट्विट
नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, 'आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Web Title: PM Narendra Modi B'Day : Pillar of the country! From Karan Johar to Akshay Kumar, Bollywood celebrities congratulate the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.