हे फॅन्स नाहीत, गरजू आहेत...! सोनू सूदच्या घरासमोर रोज सकाळी लागते लांबच लांब रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:57 AM2022-06-13T11:57:54+5:302022-06-13T11:58:27+5:30

Sonu Sood : फिल्मी स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची गर्दी, त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सोनू सूदच्या घराबाहेर फॅन्सची नाही तर गरजूंची गर्दी आहे.

People Gather Outside Sonu Sood's House in Mumbai | हे फॅन्स नाहीत, गरजू आहेत...! सोनू सूदच्या घरासमोर रोज सकाळी लागते लांबच लांब रांग

हे फॅन्स नाहीत, गरजू आहेत...! सोनू सूदच्या घरासमोर रोज सकाळी लागते लांबच लांब रांग

googlenewsNext

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर फॅन्सची गर्दी रोजचीच. अमिताभ बच्चन यांच्यापासून सलमान खान, शाहरूख खान यांच्या घराबाहेर रोज शेकडो चाहते ताटकळत उभे असतात.  पण ‘या’ एका सेलिब्रिटीच्या घरासमोरची गर्दी वेगळी आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्याबद्दल. कोरोना काळात सोनू सूद गरजूंच्या मदतीसाठी दिवसरात्र खपला. अनेक गरजवतंताची त्याने सढळ हाताने मदत केली. कोरोनाचा कहर नियंत्रणात आला. पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ अद्यापही सुरू आहे. रोज शेकडो लोक सोनू आपली मदत करेल, या आशेनं त्याच्या घरासमोर गर्दी करतात. 

फिल्मी स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची गर्दी, त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सोनू सूदच्या घराबाहेर फॅन्सची नाही तर गरजूंची गर्दी आहे. याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत सोनू सूदच्या घराबाहेर मोठी रांग लागली आहे. या रांगेतील काहींच्या हातात कागदपत्र आहेत, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू. अनेक लोक वैद्यकीय मदतीसाठी सोनूच्या मदतीची अपेक्षेनं आले आहेत. सोनू आपली मदत करेल, अशी खात्री या लोकांना आहे.

सोनू स्वत: या गर्दीला भेटून त्यांच्या समस्या ऐकताना व्हिडीओत दिसतोय. अलीकडे सोनूने बिहारच्या एका लहान मुलीच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च उचलला होता. तिला चार हात आणि चार पाय होते. सोनू दिवसरात्र गरजू व्यक्तींची मदत करण्यासाठी तयार असतो. आजपर्यंत सोनूने कुणालाही निराश केलेलं नाही. तो प्रत्येकाची मदत करतो. सोनूचं नाव देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. त्यामुळे लोक इतर कुणाकडेही मदत मागण्यापूर्वी सोनूकडे येतात. 

 

Web Title: People Gather Outside Sonu Sood's House in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.