पवन कल्याणच्या नशिबी नाही संसारसुख; तिसऱ्या पत्नीपासूनही होणार विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:46 PM2023-07-05T12:46:47+5:302023-07-05T12:46:54+5:30

Pawan Kalyan:तिसऱ्यांदा मोडणार पवन कल्याणचा संसार?

pawan kalyan headed for a divorce telugu star splits from third wife anna lezhnova | पवन कल्याणच्या नशिबी नाही संसारसुख; तिसऱ्या पत्नीपासूनही होणार विभक्त

पवन कल्याणच्या नशिबी नाही संसारसुख; तिसऱ्या पत्नीपासूनही होणार विभक्त

googlenewsNext

सुपरहिट सिनेमांसाठी ओळखला जाणारा अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. अभिनय क्षेत्रात अमाप यश मिळालेल्या या अभिनेत्यावा वैवाहिक जीवनात फारसं यश मिळालं नाही. वयाच्या ५१ व्या वर्षी लग्नगाठ बांधलेल्या या अभिनेत्याचं तिसरंही लग्न मोडलं आहे. पवन कल्याण लवकरच त्याची तिसरी पत्नी अन्ना लेझनेवापासून (Anna Lezhnova) घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

पवन कल्याण याने ११ वर्ष संसार करुन पहिलं लग्न मोडलं. त्यानंतर दुसरं लग्न केलं. मात्र, हा संसारही फार काळ टिकला नाही. तीन वर्षात त्याने काडीमोड घेतला. दोन लग्न मोडल्यानंतर पवन कल्याण याने २०१३ मध्ये तिसरं लग्न केलं. मात्र, १० वर्ष संसार केल्यानंतर त्याचं हे लग्नदेखील मोडल्याचं म्हटलं जात आहे.
अन्ना लेझनेवासोबत तिसरं लग्न केल्यानंतर आता पवनच्या वैवाहिक जीवनात खटके उडू लागले आहेत. या जोडीमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे ते विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप याविषयी अभिनेत्याने कोणतंही भाष्य केलेलं नाही.

कोण आहे पवन कल्याणची तिसरी पत्नी

पवन कल्याणच्या तिसऱ्या बायकोचं नाव अन्ना लेझनेवा असं आहे. ती एक मॉडेल आहे. सध्या ती तिच्या मुलांसोबत दुबईमध्ये राहात आहे.

पवन कल्याणने यांच्याशी केलं होतं पहिलं लग्न

१९९७ मध्ये पवन कल्याणने नंदिनीसोबत लग्न केलं. मात्र, २००८ मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर एका वर्षाने त्याने लगेच रेनू देसाईसोबत लग्न केलं. मात्र, हा संसार २०१२ मध्ये मोडला. त्यानंतर पुन्हा वर्षभरानंतर त्याने २०१३ मध्ये अन्नासोबत लग्न केलं. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पवन कल्याणने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे त्याची लोकप्रियता एवढी अफाट आहे की, अल्पावधीतच त्याला 1.7 मिलियनपेक्षा अधिक चाहत्यांनी फॉलो केलं आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: pawan kalyan headed for a divorce telugu star splits from third wife anna lezhnova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.