वे माही! राघव अन् परिणीतीच्या साखरपुड्याचा रोमँटिक Video, गालावर Kiss अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:07 IST2023-05-14T13:06:44+5:302023-05-14T13:07:15+5:30
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुडा अतिशय ग्रँड झाला.

वे माही! राघव अन् परिणीतीच्या साखरपुड्याचा रोमँटिक Video, गालावर Kiss अन्....
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pariniti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) यांचा साखरपुडा काल पार पडला. दिल्लीतील कपूरथाला हाऊस याठिकाणी हा सोहळा थाटामाटात साजरा झाला. यावेळी अनेक नेते मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या एंट्रीने सर्वांचंच लक्ष वेधलं. यावेळी परिणीती आणि राघव या क्यूट कपलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुडा अतिशय ग्रँड झाला. परिणीतीच्या 'केसरी' सिनेमातील 'वे माही' हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत असताना हे कपल गाणं एंजॉय करतानाचा हा व्हिडिओ आहे. तसंच परिणीती गाण्यावर लिपसिंक करत आहे तर राघव तिच्याकडे कौतुकाने बघत आहे. तो तिच्या गालावर किस करतानाचा रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
बऱ्याच दिवसांच्या चर्चांनंतप परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा झाला. परिणीतीने मनिष मल्होत्रा डिझाईन सुंदर व्हाईट ड्रेस परिधान केला होता. साखरपुडा झाल्यावर दोघांनी बाहेर येत कॅमेऱ्यासमोर पोज दिली. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.