'प्रेमाच्या रंगात न्हाऊनी' परिणीती आणि राघव चढ्ढा यांचं स्काय ब्लू कपड्यांत ट्युनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 16:18 IST2023-09-17T16:16:37+5:302023-09-17T16:18:00+5:30
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र स्पॉट झाले. यावेळी दोघांनीही ट्विनिंग केल्याचे दिसलं.

Parineeti Chopra and Raghav Chadha
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ते विवाहबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र स्पॉट झाले. यावेळी दोघांनीही ट्विनिंग केल्याचे दिसलं.
परिणीती आज सकाळी मुंबई येथून दिल्लीला रवाना झाली. दिल्ली विमानतळावर राघव चढ्ढा तिला घ्यायला पोहचले. यावेळी दोघांनीही ट्विनिंग केल्याचे दिसलं. परिणीती डेनिम जीन्स, फिकट निळ्या शर्टसह पांढऱ्या टँक टॉपमध्ये दिसली. तर आर नाव असलेली टोपी देखील घातली होती. तर राघव चढ्ढाही निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसले. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर वेडिंग ग्लो दिसला.
परिणीती आणि राघव यांचा मे 2023 मध्ये साखरपुडा झाला होता. आता 24 सप्टेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. बहीण प्रियांका चोप्राप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार आहे. उदयपूर पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे कळते. 23 सप्टेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. या जोडप्याने त्यांच्या संगीतासाठी 90 च्या दशकाची थीम देखील ठेवली आहे. तर ३० सप्टेंबरला चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन पार पडणार आहे. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधीलसेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत.
लग्नाच्या घाईगडबडीतच परिणीतीचा आगामी चित्रपटही रिलीजसाठी सज्ज आहे. ती अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं. दोघेही यूकेमध्ये शिकत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते.