"अक्षय कुमार मित्र नाही?" अखेर परेश रावल यांनी 'त्या' वक्तव्यावर सोडलं मौन, म्हणाले-"माझं डोकं खराब..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:02 IST2025-05-09T18:00:10+5:302025-05-09T18:02:24+5:30
अक्षय कुमार मित्र नाही, असं वक्तव्य परेश रावल यांनी केलं होतं. त्याचे अनेक अर्थ त्यांच्या चाहत्यांनी काढले. अखेर परेश यांनी स्वतः या वक्तव्यावर मौन सोडलंय

"अक्षय कुमार मित्र नाही?" अखेर परेश रावल यांनी 'त्या' वक्तव्यावर सोडलं मौन, म्हणाले-"माझं डोकं खराब..."
अक्षय कुमार (akshay kumar) आणि परेश रावल या जोडीचे अनेक सिनेमे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सध्या ते दोघेही 'हेरा फेरी ३' सिनेमाचं शूटिंग करत आहेत. अक्षय कुमार आणि परेश रावल (paresh rawal) यांची ऑफस्क्रीन बाँडींगही अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येते. अशातच परेश रावल यांनी"अक्षय कुमार मित्र नाही तर फक्त एक सहकारी आहे", असं वक्तव्य केल्याने मोठीच चर्चा झाली. अखेर स्वतः परेश रावल यांनी त्या वक्तव्यावर मौन सोडलं.
परेश यांनी त्या वक्तव्यावर सोडलं मौन
परेश रावल अक्षयविषयी जे काही बोलले त्याविषयी त्यांनी बॉलिवूड हंगामला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "अरे माझं डोकं खराब झालंय. मी फक्त इतकंच म्हणालो होतो की, तो माझा सहकारी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला मित्र म्हणता याचा अर्थ असा असतो की, तुम्ही त्याला महिन्यातून ५- ६ वेळा भेटता. किंवा तुम्ही एका आठवड्यात त्याला अनेकवेळा भेटता. याशिवाय मी आणि अक्षय अजिबात सोशल नाही आहोत."
"आम्ही कोणत्याही पार्टीत एकमेकांना भेटायचा प्रश्नच नाही. त्यामुळेच मी त्याला सहकारी म्हणालो. पण लोकांनी वेगळेच अंदाज बांधले. तुमच्यात काही बिनसलंय का? असं लोक मला विचारत आहेत. अरे दादा, काही नाही झालंय आमच्यामध्ये.", अशाप्रकारे परेश यांनी सविस्तर खुलासा केला.
परेश रावल काय म्हणाले होतो?
परेश रावल यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं की, अक्षय कुमारला ते खास मित्र म्हणू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर देताना परेश रावल म्हणाले की, "अक्षय कुमार माझा मित्र नाही तर सहकारी आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नाती ही प्रोफेशनल असतात. माझे खरे मित्र हे शाळा आणि मी जेव्हा रंगभूमीवर कार्यरत होतो तेव्हा झाले आहेत. यामध्ये जॉनी लिव्हर, ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह हे माझे खास मित्र आहेत."