पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:50 IST2025-05-13T17:50:20+5:302025-05-13T17:50:56+5:30

माझ्यासाठी हा क्षण किती मोलाचा आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही

Pankaj Tripathi to begin shoot of his next movie in his hometown in bihar | पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..."

पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..."

'मिर्झापूर' सीरिज असो किंवा 'बरेली की बर्फी', 'स्त्री' हे सिनेमे असो अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या अभिनयाने सर्वांनाच आपलंसं केलं. सहसजसुंदर अभिनय, फक्त हावभावातूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं  यांनी कायम त्यांचे लवकरच आगामी सिनेमाचं शूट सुरु करणार आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांच्या बिहारमधील गावीच हे शूट होणार आहे. यामुळे ते खूप उत्साहित आहेत.

पहिल्यांदाच बिहारमध्ये शूटिंग करणार असल्याने ते म्हणाले, "माझ्यासाठी हा क्षण किती मोलाचा आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही. मी बिहारच्या एका छोट्याशा गावातील धूळभऱ्या गल्ल्यांमधून एक कलाकार म्हणून माझा प्रवास सुरु केला. थिएटर आणि नुक्कड नाटक करताना मी कधीच हा विचार केला नाही की एक दिवस मी सिनेमाच्या क्रू सोबत याच गल्लीबोळांमध्ये येईन."

ते पुढे म्हणाले, "हिंदी सिनेइंडस्ट्रीत इतकी वर्ष घालवल्यानंतर आज पहिल्यांदा मी माझ्या गृहराज्यात सिनेमाचं शूट करणार आहे. बिहारमध्ये हिंदी सिनेमांचं शूट तसं कमीच होतं. मला आठवतंय मनोज वाजपेयींचा २००३ साली आलेला 'शूल' हा सिनेमा बिहारमध्ये शूट झालेला शेवटचा सिनेमा आहे. बिहार शूटिंगसाठी बऱ्याच काळापासून उपेक्षितच राहिलं आहे. आपल्या मातीशी जोडलेल्या गोष्टीवर काम करणं एक वेगळाच आणि जादुई अनुभव असतो. मी प्रत्येक सीन, प्रत्येक स्थान आणि प्रत्येक कलाकाराशी जोडलेला असतो."

३५ दिवस चालणार शूट

विशेष म्हणजे बिहारच्याच अमित रायसोबत पुन्हा काम करता येणं या प्रोजेक्टला आणखी खास बनवतं. आम्ही दोघंही बिहारची भाषा आणि या भूमीची भावना जाणतो. हे स्क्रीनवरही दिसेल असा मला विश्लास आहे. त्यामुळे हा सिनेमा एक प्रोजेक्टपेक्षाही खूप काही आहे. ज्या बिहारने मला यशस्वी बनवलं त्यासाठी हा सम्मान आणि आभार दर्शवणारा सिनेमा आहे." या सिनेमाचं लेखन बिहारच्याच दोन कथाकारांनी केलं आहे. ३५ दिवस या सिनेमाचं शूट होणार आहे. पवन मल्होत्रा, राजेश कुमार आणि बिहारचे काही कलाकार यामध्ये दिसणार आहेत. 

Web Title: Pankaj Tripathi to begin shoot of his next movie in his hometown in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.