'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:10 IST2025-07-16T13:09:54+5:302025-07-16T13:10:21+5:30
सीरिजवरुन येतोय सिनेमा, ओरिजनल स्टारकास्ट दिसणार मात्र 'या' अभिनेत्याची जागा जितेंद्र कुमारने घेतली

'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
ओटीटीवर गाजलेली वेबसीरिज 'मिर्झापूर'ची (Mirzapur) चाहत्यांध्ये प्रचंड क्रेझ आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा, रसिका दुग्गल, विक्रांत मेस्सी, श्रिया पिळगावकर, दिव्येंदू या कलाकारांनी सीरिजमध्ये भूमिका साकारल्या. पंकज त्रिपाठींनी अखंडा त्रिपाठीची भूमिका केली ज्यावर अनेक मीम्सही बनले. 'मिर्झापूर'सीरिजवरुन आता त्याचा सिनेमाही येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. या सिनेमात 'पंचायत'फेम अभिनेता जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) एन्ट्री झाली आहे.
'मिर्झापूर' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सीरिजच्या पहिल्या भागात विक्रांत मेस्सी बबलू पंडितच्या भूमिकेत दिसला होता. तर अली फजल गुड्डू पंडितची भूमिका साकारत आहे. बबलू पंडितचा पहिल्याच सीझनमध्ये मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता सिनेमात बबलू पंडितची भूमिका साकारण्यासाठी विक्रांत मेस्सीलाच विचारण्यात आलं होतं. मात्र तो इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याने त्याने सिनेमाला नकार दिला. आता त्याची हीच भूमिका 'पंचायत' फेम अभिनेता जितेंद्र कुमार साकारणार आहे.
काही दिवसांपूर्वीच फरहान अख्तरने'मिर्झापूर:द फिल्म' सिनेमाची घोषणा केली. त्यानेच सीरिजचीही निर्मिती केली होती. सीरिजवरुन सिनेमा करणं हे भारतात पहिल्यांदाच घडत आहे. सिनेमात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू ही ओरिजिनल स्टारकास्ट आहे. 'मिर्झापूर: द फिल्म' पुढील वर्षी रिलीज होणार आहे.