"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:40 IST2025-11-27T13:39:34+5:302025-11-27T13:40:17+5:30
पलाश मुच्छललाही आलेला हृदयविकाराचा धक्का? डॉक्टर म्हणाले...

"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा ग्रँड विवाह सोहळा सांगली येथे पार पडणार होता. मेहंदी, संगीत हे फंक्शन झाल्यावर अचानक लग्न लांबणीवर पडल्याची बातमी आली. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं. नंतर पलाश मुच्छललाही अॅडमिट केल्याची बातमी आली. इतकंच नाही तर त्याचे एका मुलीसोबत फ्लर्ट करतानाचे चॅट्स समोर आले. हा सगळा प्रकार गोंधळात पाडणारा होता. पलाशला अचानक सांगलीतील रुग्णालयातून मुंबईला शिफ्ट करण्यात आलं. आता नुकतंच पलाशच्या डॉक्टरांनी त्याची हेल्थ अपडेट दिली आहे.
मिड डे रिपोर्टनुसार, पलाश मुच्छलचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक दीपेंद्र त्रिपाठी यांनी त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "पलाशने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. मात्र त्याची केस ही सीरियर कार्डियाक अटॅक नसून त्याला टेन्शनमुळे हा त्रास झाला."
पलाशला सुरुवातीला सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्याला सोमवारी मुंबईच्या रुग्णालयात आणण्यात आले. मुंबईतील एसआरव्ही रुग्णालयात पलाशने छातीत दुखणे, अस्वस्थता आणि श्वास घेण्यास अडचण या तक्रारी डॉक्टरांना सांगितल्या. यावर डॉक्टरांनी कार्डियाक टेस्ट, ईसीजी आणि २डी ईकॉर्डिओग्राफी या टेस्ट्स केल्या. डॉक्टर म्हणाले, "त्याच्या शरिरात काही लेव्हल वाढलेल्या दिसल्या पण कार्डियाक अटॅक आणि किंवा मेडिकल इमर्जन्सीची लक्षणं दिसली नाहीत. प्रथमोपचार केल्यानंतर ऑक्सिजन थेरपी सुरु केली. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं."
पलाशची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कन्फर्म केलं आहे. तसंच त्याच्या डिस्टार्जची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र पलाशला तीन आठवडे घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान स्मृती-पलाशच्या लांबणीवर पडलेल्या लग्नाबाबत पुढे काहीच अपडेट आलेलं नाही.