"पलाशला मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा पुरावा आहे का?", स्मृती मानधनाच्या मित्राच्या आरोपांवर सिंगरच्या वकिलाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:27 IST2026-01-24T12:27:16+5:302026-01-24T12:27:44+5:30

स्मृतीच्या सांगलीतील मित्राने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. ४० लाख फसवणुकीच्या आरोपांनतर स्मृतीच्या मित्राने पलाशला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा आरोपही केला. त्यावर आता पलाशच्या वकिलांनी उत्तर देत याचा पुरावा आहे का? असा प्रश्न स्मृतीच्या मित्राला विचारला आहे. 

palash mucchal lawyer said there is no evidence that he caught red handed in bed with another women | "पलाशला मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा पुरावा आहे का?", स्मृती मानधनाच्या मित्राच्या आरोपांवर सिंगरच्या वकिलाचं उत्तर

"पलाशला मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा पुरावा आहे का?", स्मृती मानधनाच्या मित्राच्या आरोपांवर सिंगरच्या वकिलाचं उत्तर

क्रिकेटर स्मृती मानधना तिच्या पर्सनल आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्मृतीच्या सांगलीतील मित्राने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. ४० लाख फसवणुकीच्या आरोपांनतर स्मृतीच्या मित्राने पलाशला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा आरोपही केला. त्यावर आता पलाशच्या वकिलांनी उत्तर देत याचा पुरावा आहे का? असा प्रश्न स्मृतीच्या मित्राला विचारला आहे. 

स्मृतीचा मित्र अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर खळबळजनक आरोप केले. त्याच्या या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं पलाश मुच्छलच्या वकिलांनी सांगितलं आहे. "विज्ञानने सांगितलं की त्याने आम्हाला ४० लाख रुपये दिले. पण त्याने हे पैसे चेकने दिले की बँक ट्रान्सफर केले याचा कोणताच पुरावा नाही. पलाशला दुसऱ्या मुलीसोबत बेडवर रंगेहाथ पकडल्याचा त्याने आरोप केला. मग याचा पुरावा कुठे आहे? आम्ही त्याला ओळखतही नाही. स्मृतीच्या वडिलांनी तिच्या मित्राची ओळख करून दिली होती. त्याच्यासोबत आमचे कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. आणि इतके दिवस तो गप्प का बसला? सध्या आम्ही कायदेशीर पद्धतीने कारवाईचा मार्ग शोधत आहोत", असं पलाश मुच्छलचे वकील म्हणाले. 

स्मृतीचा मित्र विज्ञानचे आरोप 

विज्ञान मानेने पलाशवर सिनेमाच्या नावाखाली ४० लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप केला आहे. २०२४ मध्ये स्मृतीमुळे पलाश आणि विज्ञान यांची भेट झाली होती. एक सिनेमा बनवतो असं सांगून पलाशने ४० लाख रुपये घेतले. सहा महिन्यात सिनेमा पूर्ण झाल्यावर नफ्यासहित पैसे करणार असंही पलाश बोलल्याचं विज्ञानने सांगितलं. पण, सिनेमाचं शूटिंग सुरू झालं नाही आणि पलाशने पैसेही परत केले नाहीत. स्मृतीसोबत लग्न झाल्यानंतर पैसे परत करतो असं पलाशने सांगितल्याचा खुलासाही विज्ञानने केला. पण, लग्न मोडल्यानंतर पलाशने फोन उचलणंही बंद केलं. याशिवाय त्याच्या आईने सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचंही विज्ञानने म्हटलं आहे. 

पलाशला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा आरोप

"मी लग्नाची तयारी (२३ नोव्हेंबर) सुरू असताना तिथे होतो. जेव्हा पलाश मुच्छलला एका दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडण्यात आले, तिथेही मी होतो. धक्कादायक प्रसंग होता. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चोप दिला", असं विज्ञानने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं. 

Web Title : स्मृति के दोस्त के आरोपों पर गायक के वकील का सवाल: क्या पलाश का सबूत है?

Web Summary : स्मृति मंधाना के दोस्त ने पलाश मुच्छल पर धोखाधड़ी और दूसरी महिला के साथ पकड़े जाने का आरोप लगाया। पलाश के वकील आरोपों से इनकार करते हुए सबूत मांग रहे हैं। दोस्त ने वित्तीय धोखाधड़ी और अफेयर देखने का दावा किया, जिसका वकील विरोध कर रहे है।

Web Title : Singer's lawyer questions proof of Palash caught with girl, Smriti's friend alleges.

Web Summary : Smriti Mandhana's friend accused Palash Muchhal of cheating and catching him with another woman. Palash's lawyer denies the allegations, demanding proof. The friend claims financial fraud and witnessing an affair, which the lawyer disputes, threatening legal action.