पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 09:42 IST2025-12-13T09:42:09+5:302025-12-13T09:42:41+5:30
'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने दावा केला आहे की, तिला 'धुरंधर'मध्ये कास्ट करण्यात आले होते.

पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या यशासोबतच, विशेषत: शेजारील देश पाकिस्तानमधून त्यावर खूप टीका होत आहे. काही लोक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'ची जोरदार टीका करत आहेत. आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने दावा केला आहे की, तिला 'धुरंधर'मध्ये कास्ट करण्यात आले होते, परंतु त्यांनी हा चित्रपट फक्त याच कारणास्तव नाकारला कारण तो 'पाकिस्तान-विरोधी' चित्रपट आहे. इतकंच नव्हे, तर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर अभिनेता रणवीर सिंगसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे हिरा सूमरो (Hira Soomro). जी 'तेरे बिन', 'खुदा और मोहब्बत' आणि 'तेरे मेरे सपने' सारख्या पाकिस्तानी नाटकांच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. अलीकडेच हिराने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती रणवीर सिंगसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रणवीरचा 'धुरंधर' चित्रपटातील लूक दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना, हिरा सूमरोने दावा केला की तिला 'धुरंधर'साठी कास्ट केले गेले होते, पण जेव्हा तिला समजले की हा चित्रपट 'पाकिस्तान-विरोधी' आहे, तेव्हा तिने तो नाकारला. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, "आता द्वेष करणारे म्हणतील की हे एआय आहे. मला 'धुरंधर'मध्ये कास्ट केले गेले होते, परंतु ज्या क्षणी मला कळले की हा एक पाकिस्तान-विरोधी चित्रपट आहे, तेव्हा मी तो नाकारला. एक अभिमानी पाकिस्तानी."
ट्रोल होतेय अभिनेत्री
हिरा सूमरोने शेअर केलेले फोटो खरेतर एआय (AI) तंत्रज्ञानाने तयार केलेले आहेत. हिराच्या या पोस्टवर आता फक्त भारतीयच नव्हे, तर पाकिस्तानी लोक देखील नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच, या खोट्या दाव्यामुळे ती ट्रोल होत आहे. एका युजरने म्हटले, "इतकी पण काय मजबूरी होती?" दुसऱ्याने लिहिले, "एका पाकिस्तान-विरोधी चित्रपटात काम न करताही हे फोटो बनवण्याचे धाडस. तुम्हाला लाज वाटायला हवी." आणखी एकाने हिराचा खोटेपणा पकडत लिहिले, "बाजी (दीदी) दुसऱ्या फोटोमध्ये तुमच्या कानाच्या खाली आणखी एका व्यक्तीचा कान राहिला आहे. आठवणीने तो काढून टाका."