दाऊदसोबत नाव जोडलं अन् पाकिस्तानी हेर म्हटलं, वादांमुळे करिअरच संपलं, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:10 IST2025-07-16T12:06:28+5:302025-07-16T12:10:08+5:30

बॉलिवूड सुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता दाऊद इब्राहिम, वादात सापडली आणि करिअर झालं उद्ध्वस्त, कोण आहे ती?

pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim debut in bollywood with dev anand film know about her journey | दाऊदसोबत नाव जोडलं अन् पाकिस्तानी हेर म्हटलं, वादांमुळे करिअरच संपलं, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

दाऊदसोबत नाव जोडलं अन् पाकिस्तानी हेर म्हटलं, वादांमुळे करिअरच संपलं, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

Bollywood Actress Anita Ayoob : एकेकाळी बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता, हे जगजाहीर आहे. ८० ते ९० च्या दशकात बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये एक घट्ट नातं होतं. त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीवर अंडरवर्ल्डचं सावट होतं. अनेकदा कलाकार देखील याबाबत व्यक्त होताना दिसतात. दाऊदचे बॉलिवूडशी असलेले संबंधही एकेकाळी चर्चेचा विषय होता. शिवाय त्या काळात अंडरवर्ल्डचे लोक त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या अभिनेत्रींना चित्रपटात कास्ट करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांवर दबाव टाकत असत. त्यामुळे सेलिब्रिटींना गँगस्टरसोबत मैत्री करणं चांगलच महागात पडलं होतं. एक अभिनेत्री होती जिला निर्मात्याने आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला होता. ही अभिनेत्री म्हणजे अनिता अयूब (Anita Ayoob) . 

बॉलिवूड इंडस्ट्रीने अनेक पाकिस्तानी अभिनेत्रींना प्रसिद्धी मिळवून दिली. मूळची पाकिस्तानची असलेली अनिता अयूबने १९८७ मध्ये ‘गर्दिश’ या पाकिस्तानी टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  पाकिस्तानमध्ये ती प्रचंड लोकप्रिय झाली. पण तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध व्हायचं होतं. तिचं हे स्वप्न देवानंद यांच्यामुळे खरं झालं. प्यार का तराना या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्याच चित्रपटाने तिला रातोरात स्टार केलं. अनितानं देव आनंद यांच्यासोबत गँगस्टरमध्येही काम केलं होतं. 

याचदरम्यान दाऊद इब्राहिमसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर तिचं करिअर उद्ध्वस्त झालं.

पाकिस्तानी हेरगिरीचे आरोप...

अनिता अयूब तिच्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. यासंदर्भात एका पाकिस्तानी मासिकात उल्लेखही करण्यात आला होता. या घटनेनंतर अभिनेत्रीवर बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला. मग ती अभिनय सोडून आपल्या मायदेशी परतली. त्यानंतर तिने उद्योगपती सौमिल पटेल यांच्यासोबत लग्नगाठ बांधून ती न्ययॉर्कमध्ये स्थायिक झालं. परंतु, त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 

Web Title: pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim debut in bollywood with dev anand film know about her journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.