प्रसिद्ध रॅपरने विष पिऊन केली आत्महत्या, कुटुंबियांनी पत्नीवर लावला मानसिक छळाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:44 IST2025-02-13T10:44:40+5:302025-02-13T10:44:55+5:30
कुटुंबाला त्याच्या पत्नीवरच संशय असून त्यांनी तिच्यावर आरोप केले आहेत.

प्रसिद्ध रॅपरने विष पिऊन केली आत्महत्या, कुटुंबियांनी पत्नीवर लावला मानसिक छळाचा आरोप
ओडिसाचा रॅपर अभिनव सिंहने (Rapper Abhinav Singh) आत्महत्या केली आहे. 'जगरनॉट' नावाने तो लोकप्रिय होता. बंगळुरू मधील राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळून आला. अभिनवच्या कुटुंबाला त्याच्या पत्नीवरच संशय असून त्यांनी तिच्यावर आरोप केले आहेत. पत्नी आणि काही लोकांनी त्याचा मानसिक छळ केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
रॅपर अभिनव सिंह इंजिनिअरही होता. केवळ ३२ व्या वर्षी त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं. मिडिया रिपोर्ट्नुसार, अभिनव सिंह बंगळुरू येथील कडुबीसनहल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. मराठाहल्ली पोलिस स्थानकात आता हे प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. प्राथमिक तपासातून रॅपरने विष पिऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
अभिनव सिंहचं 'कटॅक अँथम' खूव गाजलं होतं. स्थानिक संस्कृतीसोबत कंटेम्पररी रॅप त्याने केलं होतं. ओडिसातील काही सोशल मुद्दे त्याने रॅपमधून मांडले होते. रॅपरच्या कुटुंबियांनी त्याच्या पत्नीविरोधात आता तक्रार दाखल केली आहे. रॅपरचे वडील विजय नंदा सिंह यांच्या तक्रारीनुसार अभिनवची पत्नी आणि इतर लोकांनी त्याला मानसिकरित्या त्रास दिला. त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात यांचाच हात आहे. पोलिस त्याच्या पत्नीसह ८ ते १० लोकांना चौकशीसाठी बोलवणार आहेत.