O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:11 IST2026-01-21T15:10:03+5:302026-01-21T15:11:45+5:30

शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'ओ रोमियो'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नाना पाटेकर, राहुल देशपांडेच्या जबरदस्त अभिनयाची झलक बघायला मिळतेय

O Romeo Trailer starring Shahid Kapoor Rahul Deshpande tripti dimri tamannah bhatia | O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा

O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा

गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'ओ रोमियो' सिनेमाची खूप चर्चा आहे. सत्य घटनेवर आधारीत तगडी स्टारकास्ट असल्यामुळे 'ओ रोमियो' सिनेमाची सध्या खूप हवा आहे. अशातच 'ओ रोमियो' सिनेमाचा खतरनाक ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये सुखद धक्का असा तो म्हणजे गायक-संगीतकार राहुल देशपांडेच्या अभिनयाची झलक बघायला मिळतेय.

'ओ रोमियो'चा ट्रेलर 

'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर माथेफिरु गुंडाच्या भूमिकेत दिसतो. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यात प्रेम जुळतं. पण घटना अशा घडतात की शाहिद कपूरला तृप्तीबद्दल तिरस्कार वाटू लागतो. दोघेही एकमेकांचा द्वेष करतात. अशातच शाहिदच्या मागावर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत नाना पाटेकर दिसतात. ट्रेलरच्या अगदी शेवटी तृप्ती आणि नाना शाहिदवर बंदूक रोखून उभे असतात. पुढे काय होणार, हे 'ओ रोमियो' सिनेमा आल्यावरच कळेल. 

साधारण ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. शाहिद कपूर बिनधास्त, बेधडक आणि खुनशी अशा गुंडाच्या भूमिकेत दिसतोय. तर त्याच्या प्रेमिकेच्या भूमिकेत तृप्ती डिमरी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. 'हैदर', 'कमिने', 'ओमकारा', 'मकबूल' अशा सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या विशाल भारद्वाज यांनी 'ओ रोमियो'चं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title : ओ रोमियो ट्रेलर: शाहिद कपूर छाए, नाना पाटेकर का दमदार अभिनय!

Web Summary : 'ओ रोमियो' का ट्रेलर रिलीज हो गया है, जिसमें शाहिद कपूर एक खूंखार गैंगस्टर के रूप में दिख रहे हैं। तृप्ति डिमरी उनकी प्रेमिका की भूमिका में हैं, और नाना पाटेकर पुलिस वाले के रूप में पीछा कर रहे हैं। राहुल देशपांडे की एक्टिंग भी चर्चा में है। विशाल भारद्वाज द्वारा निर्देशित, फिल्म 13 फरवरी को रिलीज होगी।

Web Title : O Romeo Trailer: Shahid Kapoor shines, Nana Patekar stuns!

Web Summary : The 'O Romeo' trailer is out, showcasing Shahid Kapoor as a fierce gangster. Tripti Dimri plays his love interest, with Nana Patekar as the pursuing cop. Rahul Deshpande's acting debut also generates buzz. Directed by Vishal Bhardwaj, the film releases February 13th.