डिसेंबरमध्ये नाही तर पुढील आठवड्यात विकी कौशल-कतरिना कैफचं लग्न?, सीक्रेट माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:16 IST2021-11-26T16:15:22+5:302021-11-26T16:16:01+5:30
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे.

डिसेंबरमध्ये नाही तर पुढील आठवड्यात विकी कौशल-कतरिना कैफचं लग्न?, सीक्रेट माहिती आली समोर
विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या लग्नाबद्दल अद्याप काहीही बोलत नसले तरी सूत्रांकडून बरीच माहिती समोर आली आहे. आता हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये लग्न पार पडण्यापूर्वी कतरिना कैफ मिसेस विकी कौशल बनणार आहे. असे समजते आहे की पुढील आठवड्यात ते दोघे कोर्ट मॅरिज करणार आहेत. इतकेच नाही तर कतरिना तिच्या होणाऱ्या सासूसोबत म्हणजेच विकी कौशलच्या आईसोबत शॉपिंग करणार आहे आणि तिच्या हातावर राजस्थानची प्रसिद्ध सोवत मेहंदी रंगणार आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा बऱ्या काळापासून सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, ते दोघे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७ ते ९ डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये विवाह करणार आहेत. बॉलिवूड लाइफच्या लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार विकी आणि कतरिना पारंपारिक लग्नाच्या आधी मुंबईत पुढील आठवड्यात कोर्ट मॅरिज करणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत राजस्थानमध्ये लग्न करणार आहे.
कतरिना करतेय सासूसोबत टाइम स्पेंड
ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ होणाऱ्या सासूसोबत चांगला टाइम स्पेंड करते आहे. वृत्तानुसार, त्या दोघी मिळून लग्नाची तयारी करत आहे. विकी आणि कतरिनाचे लग्नाचे स्थळ आधीपासूनच चर्चेत आले आहे. असे सांगितले जात आहे की दोघे सवाई माधोपूरच्या लक्झरी रिसॉर्ट सिक्स सेंसमध्ये पार पडणार आहे. वेडिंग वेन्यूवर मोबाईल नेण्यासाठी मनाई आहे.
७, ८ आणि ९ डिसेंबरला पार पडणार लग्न
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न ७, ८ आणि ९ डिसेंबरला कॅथलिक आणि हिंदू रिती रिवाजात होणार आहे. कतरिनालादेखील सब्यसाची तयार करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तिचे हात राजस्थानची प्रसिद्ध सोजत मेहंदीने सजणार आहे. यात केमिकल्स नसतात आणि ही जगभरात प्रसिद्ध आहे. या मेहंदीची किंमत जवळपास ५०००० ते १ लाख रुपये इतकी आहे.