नोरा फतेहीच्या यूट्यूब चॅनलवरील सर्वात हिट डान्स व्हिडीओ, ५ कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 16:06 IST2020-12-17T16:04:24+5:302020-12-17T16:06:24+5:30
नोरा फतेहीचं 'पपेटा' हे गाणं तिने आणि रे वॅनीने गायलंय. पपेटा गाण्याची बोल वॅनी, राजा कुमारी, अमर बाज आणि इब्राहीन बहाशने लिहिले आहेत.

नोरा फतेहीच्या यूट्यूब चॅनलवरील सर्वात हिट डान्स व्हिडीओ, ५ कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज....
नोरा फतेही सिनेमात डान्स करण्यासोबतच म्युझिक व्हिडीओ सुद्धा करते. टीव्हीवर ती डान्स शोमध्ये जज म्हणूनही ती दिसली. त्यासोबतच ती तिचं यूट्यूब चॅनलही चालवते. या चॅनलवर ती डान्स टॅलेंट आणि बॅक स्टेजच्या गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असते. तिच्या यूट्यूब चॅनलवर एकूण ३३ व्हिडीओ आहेत. यातील एक व्हिडीओ सर्वात जास्त बघितला गेलाय. नोरा फतेहीचं 'पपेटा' या गाण्याला ५ कोटी व्ह्यू मिळाले आहेत.
नोरा फतेहीचं 'पपेटा' हे गाणं तिने आणि रे वॅनीने गायलंय. पपेटा गाण्याची बोल वॅनी, राजा कुमारी, अमर बाज आणि इब्राहीन बहाशने लिहिले आहेत. तर हे गाणं रजित देवने कोरिओग्राफ केलं आहे. नोरा फतेहीच्या या यूट्यूब व्हिडीओवर फॅन्सच्या एकापेक्षा एक कमेंटही येत आहेत.
नोरा फतेहीने 'बाहुबली', 'सत्यमेव जयते' आणि 'मरजावां' सारख्या सिनेमात परफॉर्म केलं आहे. अनेक म्युझिक व्हिडीओतही ती दिसली आहे. नोरा सध्या चांगलीच लाइमलाइटमध्ये आहे. तिचं गुरू रंधावासोबतचं 'नाच मेरी राणी' हे गाणं नुकतंच सुपरहिट ठरली आहे. तसेच ती बिग बॉसमध्ये आल्यावरही चर्चेत आली होती. आता ती 'भुज' सिनेमात दिसणार आहे.