'या' अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना VIDEO VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 13:03 IST2019-08-29T13:01:33+5:302019-08-29T13:03:41+5:30
या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटचीही शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'या' अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना VIDEO VIRAL
एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री नोरा फतेहीसोबत. नुकतेच ‘पछताओगे’ गाण्याची सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नोराने घातलेला डिझायनर ड्रेस नोरासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे नोरा भलतीच नर्व्हस झाली.
विकी कौशल आणि नोरा फतेही यांच्या ‘पछताओगे’ गाण्याची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओ 3 कोटी 88 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. त्यावेळी विक्की कौशल आणि नोरा फतेहीने 'पछताओगे' या गाण्यावर डान्स केला. या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटचीही शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की नोरा स्टेज वर विक्कीसोबत डान्स करताना दिसते आहे. हे सगळं व्हिडिओत कैद झालं. यावेळी नोरानं पिंक रंगाचा वनपीस परिधान केला होता तर विकी कौशलने काळ्या रंगाचा जॅकेट घातलं होतं.
'पछताओगे' या गाण्याला अर्जित सिंगने स्वरसाज दिला आहे आणि दिग्दर्शन अरविंद खैरानेनं केलं आहे. या संपूर्ण गाण्याचं शूटिंग शिमल्यात झालं आहे.'पछताओगे'च्या सक्सेस पार्टीत टी-सीरिजचे मॅनेजिंग डिरेक्टर भूषण कुमारदेखील पहायला मिळाले. भूषण कुमार यांनी या सक्सेससाठी विकी व नोराची प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की, चांगल्या कलाकारांसोबत टीसीरिज यापुढेही म्युझिक अल्बम बनवित राहणार आहे.