नोरा फतेहीचा सलमानच्या गाण्यावरील जबरदस्त बेली डान्स पाहून फॅन्सची बोलती बंद, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 15:19 IST2020-09-29T15:18:23+5:302020-09-29T15:19:00+5:30
नोरा 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत' या सलमानच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. नोराच्या या डान्सचं तिचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

नोरा फतेहीचा सलमानच्या गाण्यावरील जबरदस्त बेली डान्स पाहून फॅन्सची बोलती बंद, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने आपल्या डान्सने लोकांच्या मनात जागा मिळवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ती नेहमीच आपल्या बहारदार डान्सने जणू धमाकाच करते. असाच डान्स धमाका तिच्या एका जुन्या व्हिडीओ बघायला मिळतो. या व्हिडीओत नोरा 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत' या सलमानच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. नोराच्या या डान्सचं तिचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.
नोरा फतेहीचा हा व्हिडीओ डान्स ऑफ यू पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. ज्याला आतापर्यंत ८७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा या गाण्यातील बीट्ससोबत जबरदस्त अंदाजात बेली डान्स केलाय. रेड ड्रेसमध्ये नोराचा लूकही कमाल दिसत आहे. नोराचा हा व्हिडीओ पाहून फॅन्सनी तिला क्वीन ऑफ बेली डान्स असंही म्हटलं आहे. सध्या नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
नोरा फतेहीच्या कामाबाबत सांगायचं तर सध्या ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. पण खास बाब ही आहे की, या शोमध्येही ती तिच्या डान्सने दर आठवड्यात धमाका करत आहे. नोरा लवकरच अजय देवगनच्या 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमात दिसणार आहे. असे मानले जात आहे की, या सिनेमात ती तिच्या डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहे. नोराने आतापर्यंत तिच्या 'दिलबर', 'कमरिया', 'गर्मी', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' सारख्या गाण्यांमधून जगाला वेड लावलं आहे.