VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 11:55 IST2020-10-29T11:53:38+5:302020-10-29T11:55:23+5:30

नोरा आणि नताशा स्टेनकोविकसोबत जुगलबंदीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोघीही 'साकी साकी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आपल्या जबरदस्त डान्सने दोघींनी प्रेक्षकांची झोप उडवली आहे. 

Nora Fatehi and Natasa Stankovic dance competition on Saki Saki song video viral | VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....

VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....

बॉलिवूड डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही सध्या वेगवेगळ्या कारणांनी चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच तिचं गायक गुरू रंधावासोबतचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही सुपरहिट झालंय. अशात तिचे अनेक डान्स व्हिडीओही सतत सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून हे नक्की लक्षात येतं की, नोराला तोड नाही. तिचा नताशा स्टेनकोविकसोबत जुगलबंदीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोघीही 'साकी साकी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आपल्या जबरदस्त डान्सने दोघींनी प्रेक्षकांची झोप उडवली आहे. 

नोरा फतेही आणि नताशा स्टेनकोविकचा हा व्हिडीओ 'डान्स स्वॅग'ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत नोरा पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये तर नताशा पिंक कलरच्या आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच फॅन्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत. (VIDEO : टेरेन्सने खास अंदाजात सर्वांसमोर व्यक्त केलं 'प्रेम', लाजून कावरी बावरी झाली नोरा फतेही...)

नोराच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं तर ती लवकरच 'भुज - द प्राइन ऑफ इंडिया'मध्ये दिसणार आहे. असे मानले जात तसेच नोराची 'दिलबर', 'कमरिया', 'साकी-साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' ही गाणी अजूनही फॅन्सच्या मनात घर करून आहेत. त्याच तिचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही काही तासातच सुपरहिट ठरलं. या गाण्याला रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. (झक्कास! नोरा फतेही शेअर केला नवा व्हिडीओ, यावेळी डान्स नाही तर तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स)

'नाच मेरी राणी' गाण्याला केवळ १० तासात १० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर १ दिवसात या व्हिडीओला तब्बल २५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा आणि गुरूने या गाण्यासाठी जोरदार प्रमोशनही केलं होतं.

Web Title: Nora Fatehi and Natasa Stankovic dance competition on Saki Saki song video viral