Naach Meri Rani actress Nora Fatehi shared a beautiful video of herself | झक्कास! नोरा फतेही शेअर केला नवा व्हिडीओ, यावेळी डान्स नाही तर तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स

झक्कास! नोरा फतेही शेअर केला नवा व्हिडीओ, यावेळी डान्स नाही तर तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स

नोरा फतेही तिच्या मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या डान्स स्टेप्ससाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिचं 'नाच मेरी राणी' गाणंही रिलीज झालं आणि या गाण्याची सगळीकडे चर्चा आहे. हे गाणं हिट झाल्याने ती सध्या हे यश एन्जॉय करते आहे. नोराने आता एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसते आणि तिचा ड्रेस सांभाळताना काही लोक दिसत आहेत.

या व्हिडीत नोरा व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. यावेळी तिथे लोकही आहेत. कारण तिच्या ड्रेसमुळे तिला एकटं चालणं कठिण झाल्याचं दिसतं. त्यामुळे हे लोक तिचा ड्रेस सांभाळत आहेत. नोराने पंजाबी गायक गुरू रंधावासोबतच एक खास फोटोही शेअर केला आहे. तिने गुरूला गाण्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नोराचे डान्स व्हिडीओ नेहमीच लोक बघतात. पण या व्हिडीओत लोक तिच्या अदांवर फिदा झालेत. (VIDEO : टेरेन्सने खास अंदाजात सर्वांसमोर व्यक्त केलं 'प्रेम', लाजून कावरी बावरी झाली नोरा फतेही...)

'नाच मेरी राणी' गाण्याला केवळ १० तासात १० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर १ दिवसात या व्हिडीओला तब्बल २५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नोरा आणि गुरूने या गाण्यासाठी जोरदार प्रमोशनही केलं होतं. (Bigg Boss 14: नोराने स्पर्धकांना दिलं 'गरमी' गाण्यातील हुक स्टेप करण्याचं चॅलेंज, पोट धरून हसू लागला सलमान)

टेरेन्सने केलं प्रपोज?

या आठवड्यात पुन्हा एकदा नोरा इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये आली होती. खास बाब तर ही आहे की, नोराला पुन्हा कोरिओग्राफर टेरेन्स लुईस स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने नोराकडे त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवलं. हे पाहून मलायका अरोरा आणि गीता कपूर थक्क झाल्या. नोरा आणि टेरेन्सचा हाच व्हिडीओ व्हायरल झालाय.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, टेरेन्स लुईस आणि नोरा फतेहीला बघून 'पहला पहला प्यार है' हे गाणं गातो. जे ऐकून नोराला आश्चर्याचा धक्का बसतो. टेरेन्सने अशाप्रकारे प्रपोज केल्याने ती लाजली. हे इतक्यावर थांबलं नाही तर टेरेन्सने नोराला उचलून घेतलं. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Naach Meri Rani actress Nora Fatehi shared a beautiful video of herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.