निमरत कौरने घेतलं गुरुद्वारात जाऊन दर्शन, बाहेर पापाराझींची गर्दी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:12 IST2024-11-15T16:12:42+5:302024-11-15T16:12:57+5:30
अभिषेक बच्चनसोबतच्या चर्चांमुळे ती सध्या लाईमलाईटमध्ये आली आहे.

निमरत कौरने घेतलं गुरुद्वारात जाऊन दर्शन, बाहेर पापाराझींची गर्दी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'द लंच बॉक्स' फेम अभिनेत्री निमरत कौर(Nimrat Kaur) सध्या चर्चेत आहे. 'दसवी' सिनेमात तिने अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली होती. अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलेलं असतानाच त्याचं नाव निमरतसोबत जोडल्याने चर्चा अधिक वाढली. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या निमरत कौरट्रोलिंगला सामोरी जात आहे. दरम्यान आज तिने गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तिथून बाहेर आल्यानंतरचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नक्की काय घडलं?
गुरुनानक जयंतीनिमित्त निमरत कौर आज गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी पोहोचली. सध्या अभिषेक बच्चनमुळे निमरत जास्तच प्रसिद्धीझोतात आली आहे. चिंतामणी रंगाचा ड्रेस, डोक्यावर ओढणी अशा लूकमध्ये ती गुरुद्वाराच्या बाहेर आली. यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी गर्दी केली होती. तेव्हा निमरत त्यांना शांतता राखा असं आवाहन करताना दिसली. यानंतर बाहेर आल्यावर तिने सर्वांमध्ये प्रसाद वाटपही केलं. निमरत सध्या जिथे जाईल तिथे व्हायरल होत आहे.
निमरतला पाहून नेटकरी म्हणतात, 'आधी हिला कोणीच फॉलो करत नव्हतं पण आता अभिषेकसोबतच्या चर्चांमुळे सगळ्यांच्या हिच्यावर नजरा आहेत'. इतकंच नाही तर अनेकांनी ऐश्वर्याशी तिची तुलना होऊच शकत नाही असंही म्हणाले.
निमरत कौरला 'द लंच बॉक्स' सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. नंतर तिने अक्षय कुमारच्या 'एयरलिफ्ट' मध्ये काम केलं. अभिषेक बच्चनसोबत ती 'दसवी' सिनेमात दिसली होती.