अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेलं नाव; अखेर निम्रत कौर व्यक्त होत म्हणाली, "वाईट वाटतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:25 IST2025-08-01T11:19:53+5:302025-08-01T11:25:44+5:30

अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांमध्ये ही अफवा पसरली. यावर आता निम्रतने प्रतिक्रिया दिली आहे. 

Nimrat Kaur reacts to rumours of her link up with abhishek bachchan slams troller | अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेलं नाव; अखेर निम्रत कौर व्यक्त होत म्हणाली, "वाईट वाटतं..."

अभिषेक बच्चनसोबत जोडलं गेलं नाव; अखेर निम्रत कौर व्यक्त होत म्हणाली, "वाईट वाटतं..."

बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरचा (Nimrat Kaur) वेगळा चाहतावर्ग आहे. 'द लंचबॉक्स'सिनेमातून ती लोकप्रिय झाली. या सिनेमाची कथा, निम्रत आणि इरफान खानचा अभिनय सगळंच प्रेक्षकांना आवडलं होतं. यानंतर निम्रत अक्षय कुमारसोबत 'एयरलिफ्ट'मध्येही झळकली. आपल्या दमदार अभिनयामुळे तिने सर्वांना प्रेमात पाडलं. २०२२ साली तिचा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan)'दसवी' सिनेमा रिलीज झाला. हाही सिनेमा चांगला चालला. मात्र मधल्या काळात निम्रत आणि अभिषेकच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांमध्ये ही अफवा पसरली.  यावर आता निम्रतने प्रतिक्रिया दिली आहे. 

'दसवी'च्या शूटिंगवेळी निम्रत आणि अभिषेक प्रेमात पडले अशी एक अफवा मधल्या काळात पसरली होती. त्यांच्या मुलाखतींचे काही व्हिडिओही व्हायरल झाले. या सगळ्या अफवांचा मनस्ताप दोघांना सहन करावा लागला. दोघांनी कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता पहिल्यांदाच निम्रत यावर बोलली आहे. न्यूज १८ च्या कार्यक्रमात ती म्हणाली,"सोशल मीडिया अमिबाप्रमाणे आहे. कधीही, कुठेही आणि कोणत्याही कारणामुळे हा पसरु शकतो. आयुष्यात आपला फोकस कशावर असला पाहिजे याबाबत मी स्पष्ट आहे. सोशल मीडियासाठी मी मुंबईत आले नव्हते. त्या काळी तर सोशल मीडिया अस्तित्वातही नव्हतं. आमच्याकडे स्मार्टफोनही नव्हते."

ट्रोलर्सला उत्तर देताना ती म्हणाली, "माझ्या आयुष्याचं लक्ष्य आणि ध्येय हे चांगलं काम करत राहणं आहे. इतर गोष्टींवर वेळ घालवणं व्यर्थ आहे. इथे लोकांजवळ खूप रिकामा वेळ आहे. खरं सांगायचं तर मला त्यांची दया येते. त्यांनी आपल्या जीवनात काळानुसार चांगलं कर्म केलं पाहिजे. अशा गोष्टीत वेळ घालवणं हे आयुष्य उद्धवस्त करण्यासारखं आहे. मला त्यांच्या संस्कारावरच संशय येतो. त्यांच्या कुटुंबासाठी वाईट वाटतं."

Web Title: Nimrat Kaur reacts to rumours of her link up with abhishek bachchan slams troller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.