'निकाह'फेम अभिनेत्री सलमा आगाचा बदलला पूर्ण लूक, बघून फॅन्स म्हणाले - नीलू विश्वास बसत नाही..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 15:15 IST2022-07-01T15:14:57+5:302022-07-01T15:15:03+5:30
Salma Agha : सलमा आगा यांना या सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सौंदर्याची चर्चा तेव्हाही होती आजही आहे. त्यांचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे.

'निकाह'फेम अभिनेत्री सलमा आगाचा बदलला पूर्ण लूक, बघून फॅन्स म्हणाले - नीलू विश्वास बसत नाही..
Salma Agha : 1982 साली रिलीज झालेला 'निकाह' सिनेमा त्या काळातील लोकांना आजही स्मरणात आहे. सिनेमाची कथा, कलाकार, डायलॉग आणि गाणी सगळं काही परफेक्ट जुळून आलं होतं. या सिनेमाची कथा चांगली असण्यासोबतच एक संदेशही यातून दिला होता. याच कारणाने बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली होती. या सिनेमातील निलोफर म्हणजे सलमा आगा आणि हैदर म्हणजे राज बब्बर यांची केमिस्ट्री आजही लोकांना आठवते. सलमा आगा यांना या सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सौंदर्याची चर्चा तेव्हाही होती आजही आहे. त्यांचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे.
निकाह सिनेमातून सलमा आगा यांनी अनेकांच्या मनात घर केलं. सलमा आगा आता 65 वर्षांच्या झाल्या आहेत. इतकंच नाही तर त्यांचा लूकही बराच बदलला आहे. पण सौंदर्य तेच आहे. त्यांचे लेटेस्ट काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे बघून त्यांच्या फॅन्सना विश्वास बसत नाहीये. एका फॅनने कमेंट केली की, नीलू विश्वास बसत नाहीये की, तुझा लूक इतका बदलला. तर एकाने लिहिलं की, तुमची सुंदरता आजही तशीच कायम आहे.
सलमा आगा यांनी निकाहसोबतच अनेक सिनेमात काम केलं. पण त्यांना खरी ओळख या सिनेमाने दिली. त्यांनी 'कसम पैदा करने वाले', 'सलमा', 'मीत मेरे मन के', 'जंगल की बेटी', 'हम और तुम', 'ताकत का तूफान' सारख्या सुपरहिट सिनेमात काम केलं. सलमा आगा आता भलेही रूपेरी पडद्यापासून दूर आहेत, पण सोशल मीडियावर त्या फोटो शेअर करत असतात.