'धुरंधर'च्या गाण्यावर थिरकला 'नॅशनल जिजू' निक जोनास, रणवीर सिंह कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:52 IST2025-12-19T15:51:27+5:302025-12-19T15:52:13+5:30
निक जोनास बॉलिवूडचा फॅन आहेच. अनेकदा तो हिंदी गाण्यांवर थिरकताना व्हिडीओ पोस्ट करतो.

'धुरंधर'च्या गाण्यावर थिरकला 'नॅशनल जिजू' निक जोनास, रणवीर सिंह कमेंट करत म्हणाला...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ साता समुद्रापार पोहोचली आहे. ग्लोबल आयकॉन, सर्वांची लाडकी देसी गर्ल प्रियंका चोप्राचा पती निक जोनासही 'धुरंधर'च्या रंगात रंगून गेला आहे. 'धुरंधर'मधील गाणी, म्युझिक जोरदार गाजतंय. अशाच एका गाण्यावर निकने आपल्या भावांसोबत ठेका धरला. त्याच्या या व्हिडीओवर रणवीर सिंहने कमेंट केली आहे.
निक जोनासबॉलिवूडचा फॅन आहेच. अनेकदा तो हिंदी गाण्यांवर थिरकताना व्हिडीओ पोस्ट करतो. सध्या सगळीकडे 'धुरंधर'ची हवा आहेच. सिनेमातील 'नैना लढावा' गाण्यावर तिने पोस्ट गाण्यावर निकने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्यासोबत त्याचे भाऊ आणि मित्रही आहेत. 'नवीन शोआधी हाईप क्रिएट करणारं गाणं आलं आहे' असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.
या रीलवर रणवीर सिंहने कमेंट केली आहे. 'हाहाहा जिजू जाने दे...' असं त्याने लिहिलं. तर निकने त्याला रिप्लाय देत लिहिले, 'भाई! आता पुढचं धुरंधर टायटल ट्रॅक. तुला आणि कुटुंबाला खूप प्रेम. लेट्स गो.' याशिवाय आदित्य धरनेही यावर कमेंट करत 'ओके..इसने आज मेरा दिन बना दिया' अशी कमेंट केली आहे.
निकची भारतातही खूप क्रेझ आहे. अनेकांनी तर त्याला नॅशनल जिजू हेच नाव दिलं आहे. निकच्या या रीलवर चाहत्यांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे 'धुरंधर' सिनेमाने आतापर्यंत ४०० कोटी पार कमाई केली. लवकरच सिनेमा ५०० कोटींच्या घरात जाईल अशी शक्यता आहे.