Video: "जुबां केसरी बोल ना"; नववधूने शाहरुखला केली विनंती; अभिनेता म्हणाला- "तुझ्या बाबांना हे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:28 IST2025-12-04T15:22:30+5:302025-12-04T15:28:16+5:30
शाहरुख खानला एका लग्नात नववधूने विमल पान मसालाचा संवाद बोलायची विनंती केली. तेव्हा शाहरुखने काय केलं? जाणून घ्या

Video: "जुबां केसरी बोल ना"; नववधूने शाहरुखला केली विनंती; अभिनेता म्हणाला- "तुझ्या बाबांना हे..."
शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखने आजवर विविध जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यातील प्रमुख जाहिरात म्हणजे विमल पान मसाला. शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांची विमल पान मसालाची जाहिरात चांगलीच गाजली. याशिवाय शाहरुखवर या जाहिरातीमुळे टीकाही झाली. अशातच शाहरुख नुकताच एका लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता. त्यावेळी नववधूने शाहरुखला 'जुबा केसरी' डायलॉग बोलण्याची विनंती केली. त्यावेळी शाहरुख काय म्हणाला, जाणून घ्या
लग्नसोहळ्यात शाहरुखसोबत काय घडलं
शाहरुख खान अलीकडेच दिल्लीतील एका हाय प्रोफाईल लग्नात सहभागी झाला होता. या लग्नसोहळ्यात शाहरुखने डान्स परफॉर्मन्स केला. त्यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या नववधूने शाहरुखला ''बोलो जुबां केसरी'' हा डायलॉग म्हणायला सांगितला. त्यावेळी शाहरुखच्या हजरजबाबी स्वभावाचं पुन्हा सर्वांना दर्शन घडलं.
नववधूने विनंती करताच शाहरुख हसला. पुढे तो हसून नववधूला म्हणतो, ''एकदा बिझनेसमनसोबत व्यवसाय केला तर पिच्छा सोडत नाहीत. गुटखावाले पण ना यार. मी जेव्हा जेव्हा ते करतो तेव्हा त्याचे पैसे घेतो डार्लिंग. तुझ्या बाबांना हे सांग. यार, चांगल्या गोष्टी करुन घ्या माझ्याकडून.''
शाहरुख खान पुढे म्हणाला, ''इथे लग्नात जुबां केसरी कशाला करत बसू मी. या गोष्टी आता बॅन झाल्या आहेत. अजिबात अशा चुकीच्या गोष्टी करु नका. यामुळे मलाही तू बॅन करशील. आणि मला सांग, तू माझी फॅन आहेस की विमलची?'' अशाप्रकारे शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.'' शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो लवकरच 'किंग' सिनेमात झळकणार आहे.