'न्यू डॅड' विकी कौशलने खरेदी केली करोडो रुपयांची लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:13 IST2025-12-06T14:06:42+5:302025-12-06T14:13:17+5:30
Vicky Kaushal : विकी कौशलने वडील झाल्यानंतर काही दिवसांतच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. नुकताच हा अभिनेता आपल्या नवीन गाडीसोबत दिसला.

'न्यू डॅड' विकी कौशलने खरेदी केली करोडो रुपयांची लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच पालक बनले आहेत. आता विकीने आपल्या कार कलेक्शनमध्ये एका नवीन आलिशान गाडीचा समावेश केला आहे. ४ डिसेंबर रोजी अभिनेता मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे तो आपल्या ब्रँड न्यू गाडीसोबत स्पॉट झाला. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलने लेक्सस LM350h 4S ही कार खरेदी केली आहे.
लेक्सस LM350h 4S ही ४-सीटर कार आहे, ज्याची किंमत ३.२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कार हायब्रिड इंजिनवर चालते. यामध्ये ब्रेक असिस्ट, रडार कॅमेरा यांसारखी ड्राइव्ह असिस्ट फीचर्स देखील आहेत, ज्यामुळे गाडी चालवणे सोपे आणि सुरक्षित होते. गाडीमध्ये क्लायमेट कंट्रोल, पॉवर डोअर, चार्जिंग, उत्तम इंटीरियर आणि वुडन-लेदरचा फिनिश देखील आहे.

नुकतेच पालक बनलेत विकी-कतरिना
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी पालक बनल्याची गोड बातमी जाहीर केली होती. त्यांना मुलगा झाल्याचे त्यांनी सांगितले. या जोडप्याने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, ''आमच्या आनंदाचा खजिना या जगात आला आहे. खूप प्रेम आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या बाळाचे स्वागत केले आहे.'' या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये विकी-कतरिनाने आम्ही भाग्यवान आहोत असे लिहिले होते.
विकी कौशलचे आगामी चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, विकी कौशल शेवटचा 'छावा' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट याच वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता विकी कौशल 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात विकीसोबत रणवीर कपूर आणि आलिया भट देखील मुख्य भूमिकेत असतील. विकी कौशलकडे अमर कौशिक यांचा 'महावतार' हा चित्रपट देखील आहे. याशिवाय तो 'तख्त' आणि 'लाहौर १९४७' मध्येही दिसणार आहे.