'नॅशनल क्रश' गिरिजा ओक दिसणार पंकज त्रिपाठींच्या सिनेमात, 'परफेक्ट फॅमिली'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:57 IST2025-11-24T13:56:33+5:302025-11-24T13:57:04+5:30
'नॅशनल क्रश'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. गिरिजा ओक नव्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा एक हिंदी सिनेमा असून 'परफेक्ट फॅमिली' असं सिनेमाचं नाव आहे. गिरिजाच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

'नॅशनल क्रश' गिरिजा ओक दिसणार पंकज त्रिपाठींच्या सिनेमात, 'परफेक्ट फॅमिली'चा ट्रेलर रिलीज
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. गिरिजाचे साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर गिरिजा चाहत्यांची 'नॅशनल क्रश' बनली. आता या 'नॅशनल क्रश'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. गिरिजा ओक नव्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा एक हिंदी सिनेमा असून 'परफेक्ट फॅमिली' असं सिनेमाचं नाव आहे. गिरिजाच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'परफेक्ट फॅमिली' सिनेमाच्या ट्रेलर २.४८ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची गोष्ट दिसत आहे. करकारिया या कुटुंबाची ही गोष्ट आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला पार्टी करण्याबाबत कुटुंबात चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. एक छोटी मुलगी, तिची आई, वडील, आजी आणि आजोबा असे घरातील सर्वच सदस्य हॉलमध्ये बसल्याचं दिसत आहे. नंतर पार्टीसाठी घरातील सदस्य बॉलिवूड स्टाइलमध्ये तयार झाल्याचं दिसत आहे. नंतर ट्रेलरमध्ये कुटुंबात वाद झाल्याचं दिसत आहे. मुलगा आणि वडिलांमधील भांडण इतकं वाढत की संपूर्ण कुटुंब भांडू लागतं. याचा परिणाम त्या छोट्या मुलीवर नकळतपणे होत असल्याचं दिसत आहे. याचा ट्रॉमा त्या मुलीला होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे.
शाळेतील शिक्षक या कुटुंबाला फॅमिली थेरेपी घेण्याचा सल्ला देतात. ते कुटुंब फॅमिली थेरेपी घेण्यासाठी पोहोचतं. आता पुढे काय होणार, हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहावा लागणार आहे. या सिनेमात गिरिजा ओकने छोट्या मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. गिरिजासोबत या सिनेमात नेहा धुपिया, मनोज पाहवा, सीमा पाहवा, कावेरी सेठ, हिरवा त्रिवेदी, गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. पंकज त्रिपाठींनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा सिनेमा युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.