शोभिता धुलिपाला 'डॉन ३' मध्ये करणार आयटम साँग? नागा चैतन्यशी साखरपुडा होताच फळफळलं नशीब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:33 IST2024-08-23T13:30:45+5:302024-08-23T13:33:35+5:30
अभिनेता रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी हे मुख्य भूमिकेत असलेल्या 'डॉन ३' मध्ये एक विशेष आयटम साँग करण्यासाठी शोभिता धुलिपालाशी बोलणी सुरू आहेत.

शोभिता धुलिपाला 'डॉन ३' मध्ये करणार आयटम साँग? नागा चैतन्यशी साखरपुडा होताच फळफळलं नशीब!
Sobhita Dhulipala : शोभिता धुलिपाला ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'द नाईट मॅनेजर' आणि 'मेड इन हेवन' यामध्ये शोभिता धुलिपालाने उत्कृष्ट अभिनय साकारला. अशातच ती नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) केलेल्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. यातच शोभिताबाबत एक नवी बातमी समोर येतेय.
आगामी 'डॉन ३' चित्रपटात शोभिताने आयटम साँग करावे यासाठी फरहान अख्तरने तिची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. ती या आयटम साँगसाठी एकदम परफेक्ट असल्याचे फरहानचे म्हणणे आहे. शोभिताने हा प्रस्ताव स्वीकारल्याचे बोलले जात आहे. मात्र, तिने याबाबत अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
शोभिता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने ८ ऑगस्ट रोजी अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा पूर्व पती नागा चैतन्यशी लग्न केले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शोभिताने २०१६ मध्ये 'रमन राघव २.० या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. शोभिताने अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय वेब सीरिज 'मेड इन हेवन'द्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश केला होता.
'डॉन' सीरिजच्या शेवटच्या दोन हिट चित्रपटांनंतर तिसरा चित्रपट येतोय. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यानंतर आता रणवीर सिंग (Ranveer Singh) 'डॉन' (Don Movie)ची जबाबदारी सांभाळणार आहे. तर रणवीरसोबत कियारा आडवाणी झळकणार आहे. 'डॉन ३'चे बजेट खूप जास्त असून हा सर्वात महागडा चित्रपट असेल. या फ्रँचायझीचा पहिला सिनेमा २००६ मध्ये रिलीज झाला होता, जो १९७८ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चनच्या 'डॉन'चा रिमेक होता. यानंतर २०११ मध्ये 'डॉन २' रिलीज झाला. आता चाहत्यांना 'डॉन ३'ची उत्सुकता आहे.