२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:50 IST2025-08-04T13:50:17+5:302025-08-04T13:50:51+5:30

हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

Must Watch Movie Sultan Salman Khan Anushka Sharma Age Gap Superhit Box Office Collection Awards | २२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार!

२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार!

Must Watch Movie: अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील वयाचं अंतर हा सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरतो आहे. वयानं लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स केल्यामुळे काही अभिनेत्यांवर सोशल मीडियावर टीका होत आहे.  पण, असा एक सिनेमा आहे, ज्यात मुख्य अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये वयाचं मोठं अंतर असूनही प्रेक्षकांनी त्या जोडीला (Bollywood Successful Pair) डोक्यावर घेतलं. दोघांमध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर होतं, पण तरीही जोडी हिट ठरली. ॲक्शन, ड्रामा, रोमान्सनं भरलेला हा सिनेमा केवळ मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज ठरला नाही, तर बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला जमवत सुपरहिट ठरला.

एवढंच नव्हे, तर या चित्रपटाने १७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर करत यशाचं शिखरही गाठलं. हा सिनेमा म्हणजे सलमान खान (Salman Khan) आणि अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) सुलतान (Sultan).  हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सलमान खानने 'सुलतान'ची भूमिका ताकदीने साकारली होती. तर अनुष्का शर्माने महिला कुस्तीपटू 'आरफा'च्या रूपात दमदार अभिनय केला होता. चित्रपटाची कथा प्रभावी होती, कलाकारांचा अभिनय जबरदस्त होता आणि संगीतही लक्षवेधी ठरलं. यामुळे प्रेक्षकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

सलमान खान अभिनीत 'सुलतान' चित्रपटाने जगभरात ६२३ कोटींची कमाई केली. हा चित्रपट जुलै २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले. 'सुलतान' चित्रपटाला एकूण १७ पुरस्कार आणि ३९ नामांकने मिळाली. हे पुरस्कार फिल्मफेअर, आयफा, झी सिने पुरस्कार इत्यादींसह विविध श्रेणी आणि समारंभांमध्ये देण्यात आले. 

'सुलतान' केवळ एक स्पोर्ट्स फिल्म नाही, तर प्रेम, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांचे चित्रण आहे. या सिनेमाची कथा अशी आहे की, सुलतान अली खान (सलमान खान) हा हरियाणामधला एक साधासुधा केबल ऑपरेटर आरफा हुसैन (अनुष्का शर्मा) या कुस्तीपटूवर प्रेम करतो. तिचं मन जिंकण्यासाठी सुलतान कुस्ती शिकायला सुरुवात करतो आणि अल्पावधीतच एक यशस्वी कुस्तीपटू बनतो. सुलतान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि पदकं जिंकतो. मात्र, गर्व आणि अहंकारामुळे तो व्यक्तिगत आयुष्यात अपयशी ठरतो. पत्नी आरफाचा विश्वास आणि नवजात मुलं गमावतो. त्यानंतर सुलतान एकटाच पडतो. पण तो पुन्हा उभा राहतो आणि आपल्या ध्येयांसाठी लढतो. हा चित्रपट जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टार वर उपलब्ध आहे. 

Web Title: Must Watch Movie Sultan Salman Khan Anushka Sharma Age Gap Superhit Box Office Collection Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.