नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:27 IST2026-03-26T12:17:59+5:302026-03-26T12:27:43+5:30

"काहींनी भूमिका नाकारली,कारण...", 'रेहमान डकैत'च्या पात्रासाठी अनेकांनी वाजवली नकार घंटा, अक्षय खन्ना म्हणालेला...

mukesh chhabra reveals about many actors rejected rehman dakait role in dhurandhar before akshaye khanna casting says | नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

Dhurandhar Movie: अभिनेता रणवीर सिंगचा स्टार 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.प्रदर्शनाच्या अवघ्या आठवडाभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. धुरंधरच्या दुसऱ्या भागाप्रमाणे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला सिनेमाचा पहिला भाग देखील प्रचंड गाजला. शिवाय त्यामध्ये रहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक झालं.अक्षय खन्नाने गँगस्टरची भूमिका इतकी प्रभावीपणे साकारली होती की, संपूर्ण चित्रपटात त्याच्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं होतं.

मात्र, धुरंधरच्या पहिल्या भागात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अक्षय खन्ना मुळातच या रोलसाठी पहिली पसंती नव्हती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला आहे. 'रहमान डकैत'च्या भूमिकेसाठी योग्य अभिनेता शोधायला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना दोन वर्षे लागली. हॉलीवूड रिपोर्टर ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाब्रा यांनी धुरंधरच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला. यावेळी 
मुकेश छाब्रा यांनी सांगितलं की, अनेक कलाकारांनी रेहमान डकैतची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांनी त्या कलाकारांचं नाव घेणं टाळलं. मात्र,  'धुरंधर' प्रदर्शित झाल्यानंतर, त्यांना ही भूमिका नाकारल्याचा पश्चात्ताप झाला. ते म्हणाले," सिनेमातील मुख्य कलाकारांपासून ते केवळ एका मिनिटासाठी दिसलेल्या पात्रांपर्यंत, मी आणि माझ्या टीमने अत्यंत बारकाईने काम केलं.दोन वर्षे, मी आणि माझ्या टीमने रात्रंदिवस यावर काम केलं. प्रत्येक पात्रासाठी कलाकाराची निवड करणं आव्हानात्मक होतं. मात्र, आदित्य धरने सांगितल्याप्रमाणे 
प्रत्येक पात्राची कल्पना करणं सोपं झालं."

मग यापुढे ते म्हणाले,"एखाद्या सीनसाठी असो किंवा एखादा संवाद, प्रत्येक कलाकाराची निवड मीच करावी अशी माझी इच्छा होती. मी आणि माझ्या टीमने दोन वर्षे प्रचंड मेहनत करून जवळपास ३०० कलाकारांचं ऑडिशन  घेतलं.धुरंधरमधील सर्वात कठीण कास्टिंग असेल तर ती रहमान डकैतची होती. या भूमिकेसाठी आम्ही अनेक नावे सुचवली, पण काहींनी ती भूमिका नाकारली. त्यांना मल्टी-स्टारर चित्रपटाचा भाग व्हायचे नव्हते. शेवटी माझ्या मनात अक्षय खन्नाचे नाव आलं."

अशी होती अक्षय खन्नाची प्रतिक्रिया...

मुकेश छाबरा यांनी रहमान डकैतची भूमिका ऑफर केल्यानंतर अक्षय खन्नाची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल  देखील सांगितलं. ते म्हणाले, "अक्षय एक असा कलाकार आहे की तुम्ही त्याला कोणतीही भूमिका द्या, तो तुम्हाला त्या भूमिकेला योग्य न्याय देतो.जेव्हा मी त्याला पहिल्यांदा या भूमिकेसाठी फोन केला, तेव्हा तो म्हणाला, 'तुमचं डोकं फिरलंय का?' मग मी कसं तरी त्याला कथा ऐकण्यासाठी तयार केलं. तो आला आणि जेव्हा मी त्याला कथा ऐकवली, तेव्हा तो त्याच्या खास शैलीत म्हणाला, 'अप्रतिम.' मग दुसऱ्याच दिवशी त्याने मला फोन करून सांगितलं, मी हा चित्रपट करत आहे." असा खुलासा त्यांनी केला.

Web Title : बॉलीवुड सितारों को 'रेहमान डकैत' की भूमिका ठुकराने का पछतावा: कास्टिंग डायरेक्टर का खुलासा।

Web Summary : 'धुरंधर' में रेहमान डकैत की भूमिका को कई अभिनेताओं ने ठुकरा दिया था। कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा ने खुलासा किया कि फिल्म की सफलता के बाद उन्हें अपने फैसले पर पछतावा हुआ। अंततः अक्षय खन्ना ने भूमिका निभाई, जिससे उन्हें सराहना मिली। छाबड़ा ने फिल्म के लिए दो वर्षों में 300 कलाकारों का ऑडिशन लिया।

Web Title : Bollywood stars regretted rejecting 'Rehman Dakait' role: Casting director reveals.

Web Summary : Many actors initially refused the role of Rehman Dakait in 'Dhurandhar'. Casting director Mukesh Chhabra revealed that after the film's success, they regretted their decision. Akshay Khanna eventually played the part, earning acclaim. Chhabra auditioned 300 artists over two years for the film.