मृणाल ठाकूर शिर्डीत! अभिनेत्रीने साईंच्या चरणी नतमस्तक होऊन घेतला आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:46 IST2025-12-15T17:45:18+5:302025-12-15T17:46:58+5:30
अभिनेत्री मृणाल ठाकूरनं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.

मृणाल ठाकूर शिर्डीत! अभिनेत्रीने साईंच्या चरणी नतमस्तक होऊन घेतला आशीर्वाद
Mrunal Thakur in Shirdi :बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मृणाल ठाकूरचे (Mrunal Thakur) बरेच चाहते आहेत. तिच्या सहज सुंदर अभिनयाने मृणालने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मृणाल तिच्या आयुष्यातले अनेक क्षण तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तसेच तिचे रिल्सचही तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता मृणाल चर्चेत आली आहे. मृणाल ठाकूरनं आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलंय.
मृणाल ठाकूर आज शिर्डी येथे पोहचली. तिने यावेळी साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अत्यंत साधेपणाने तिने दर्शन घेतले. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक विशेष समाधान आणि शांतता दिसत होती. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मृणालने पारंपरिक पेहराव केला होता. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
मृणाल मूळची धुळ्याची आहे. मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिने अभिनयाची सुरुवातही मराठीतूनच केली होती. नंतर तिने हिंदी मालिकेतूनही स्वत:ची वेगळी छाप पाडली. आज ती हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत आघाडीची अभिनेत्री बनली आहे. ''सीतारामम', 'हॅलो पापा', 'जर्सी', 'बाटला हाऊस', 'द फॅमिली स्टार' मध्ये दिसली आणि 'सन ऑफ सरदार २' या सिनेमांमध्ये ती दिसली आहे.