अभिनेत्री Mrunal Thakur ला कोरोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टमधून दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 15:58 IST2022-01-01T15:57:04+5:302022-01-01T15:58:28+5:30
Mrunal Thakur tested corona positive : अभिनेत्री मृणाल ठाकूर हिलाची कोरोनाची लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. मृणालने सांगितलं की, तिच्या कोरोनाची हलकी लक्षणे आहेत.

अभिनेत्री Mrunal Thakur ला कोरोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टमधून दिली माहिती
मुंबईत कोरोना व्हायरसच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या दररोज बातम्या समोर येत आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिलाची कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. मृणालने सांगितलं की, तिच्या कोरोनाची हलकी लक्षणे आहेत.
अभिनेत्री मृणालने पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता माझ्यात कोरोनाची हलकी लक्षणं आहेत. पण मला बरं वाटत आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्सकडून देण्यात आलेला प्रोटोकॉल फॉलो करत आहे. जर तुमच्यापैकी कुणी माझ्या संपर्कात आले असाल तर कृपया कोरोनाची टेस्ट करा. सुरक्षित रहा.
मृणाला ठाकूर काही दिवसांपूर्वी तिच्या आगामी 'जर्सी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. पण आता तिच्या या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. जर्सी रिलीज डेट वाढत्या कोरोना केसेसमुळे पुढे ढकलली आहे. आता हा सिनेमा कधी रिलीज होईल याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. जर्सीमध्ये मृणाल अभिनेता शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. यात शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. तर मृणाल त्याच्या पत्नीची.
दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झाली आहे. त्यात करिना कपूर खान, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, रिया कपूर, अंशुला कपूर, शिल्पा शिरोडकर, नोरा फतेही यांचा समावेश आहे.