"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:20 IST2026-02-16T11:18:31+5:302026-02-16T11:20:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे नाव एकमेकांशी जोडले जात होते. इतकेच नाही तर ते दोघे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.

"माझा पार्टनर फक्त..."; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत, काय म्हणाली?
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांचे नाव एकमेकांशी जोडले जात होते. इतकेच नाही तर ते दोघे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. आता या सर्व चर्चांवर मृणाल ठाकूरने पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मृणालने या अफवांवर भाष्य करताना म्हटले की, तिला या चर्चा खूपच मनोरंजक वाटल्या. तिने अफवा पसरवणाऱ्यांचे आभार मानत म्हटले की, "जर मी ३ कोटी, ६ कोटी किंवा १० कोटी रुपये खर्च केले असते, तरी मला इतकी पब्लिसिटी कधीच मिळाली नसती. त्यामुळे जे कोणी या खोट्या अफवा पसरवत आहेत, त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद!" मृणालच्या या उत्तराने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलताना मृणाल म्हणाली की, ती एक अतिशय मोकळ्या स्वभावाची व्यक्ती आहे. जर तिच्या आयुष्यात खरोखरच कोणी आले, तर ती स्वतःहून सर्वांना सांगेल. "सध्या माझ्या आयुष्यात कोणीही नाही, माझा पार्टनर फक्त कॅमेरा आहे," असे म्हणत तिने सध्या ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट केले.
मृणाल ठाकूर लवकरच 'दो दिवाने सहर में' (Do Deewane Sehar Mein) या चित्रपटात दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असून यामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला आणि रवी उदयवार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अभिनेता आदिवी शेष सोबत 'डकैत' या सिनेमातही झळकणार आहे.