"वांग्यानं भरीत आन् एखादं बट्ट..."; मृणाल ठाकूरचं अहिराणी ऐकलं का? व्हिडीओ पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:06 IST2026-02-05T10:04:22+5:302026-02-05T10:06:44+5:30
मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी नुकतंच 'दो दिवाने सहर मै' सिनेमाच्या एका इव्हेंटला सहभागी होते. तेव्हा समोर असलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला.

"वांग्यानं भरीत आन् एखादं बट्ट..."; मृणाल ठाकूरचं अहिराणी ऐकलं का? व्हिडीओ पाहून चाहते थक्क
मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. मृणालने आजवर विविध हिंदी सिनेमात याशिवाय साऊथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय. अलीकडच्या काळात मृणालने विविध सिनेमांमधून तिच्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. मृणालची मराठी भाषेशी नाळ सुटली नाहीये. ती अनेकदा मराठी भाषेत व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना थक्क करुन सोडते. अशातच मृणालने नुकतंच एका व्हिडीओत अहिराणी भाषा बोलली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मृणालन अहिराणी बोलून मैफिल लुटली
मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी नुकतंच 'दो दिवाने सहर मै' सिनेमाच्या एका इव्हेंटला सहभागी होते. तेव्हा समोर असलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला. ''तुले सर्वात जास्त काय आवडतं? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी'?' हा प्रश्न ऐकताच मृणालला हसू आवरलं नाही. ती म्हणाली, ''काय बोली राह्यली. अडीच वाजीगयना, जेवायना शे मले. वांग्यानं भरीत पहिले. एखादी बट्ट जोडे.'' अशाप्रकारे मृणालने अहिराणी भाषेत उत्तर देऊन सर्वांना चकीत करुन सोडलं.
मृणाल जेव्हा अहिराणी भाषेत उत्तर देत होती तेव्हा सिद्धार्थही तिच्याकडे पाहून आश्चर्यचकीत झाला होता. अशाप्रकारे मृणाल ठाकूरने अहिराणीत बोलून चाहत्यांचं मन जिंकलं. 'दो दिवाने सहर मै' सिनेमात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जोडी जमणार आहे. या दोघांच्या या रोमँटिक सिनेमाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा २० फेब्रुवारी २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.