"एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं...", बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:54 IST2026-02-24T15:49:48+5:302026-02-24T15:54:24+5:30

बॉडी शेमिंगची शिकार झाली होती मृणाल ठाकूर; स्वत:च केला खुलासा, अक्षय कुमारचा 'तो' सल्ला आला कामी

mrunal thakur reveals about she used to cry after hearing people taunt but akshay kumar advice help him | "एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं...", बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... 

"एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं...", बॉडी शेमिंगबाबत मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... 

Mrunal Thakur: टीव्ही मालिकांपासून ते बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. अभिनय, सौंदर्य आणि साधेपणाच्या जोरावर मृणालने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मृणाल आज जरी सिनेसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री असली तिचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला शरीरावरून टीका सहन करावी लागली होती. असं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सध्या मृणाल ठाकूर 'दो दीवाने सहर में' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचनिमित्ताने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता असं म्हटलं. यावेळी ती म्हणाली," एकेकाळी असे काही दिवस होते जेव्हा मी रडत रडत झोपायचे. सकाळी उठल्यावर बघायचे तर माझे डोळे सुजलेले असायचे. शिवाय स्वत:ला म्हणायचे की आपण यासाठी पात्र नाही."

अभिनेत्री पुढे म्हणाली,"या भावनांवर मात करण्यासाठी खूप धाडस करावं लागतं, विशेषतः अशा वातावरणात जिथे आपल्याला आधार देणारं कोणी नसतं. त्यानंतर मृणालने सांगितलं, तिला हळूहळू जाणवलं की केवळ समोरच्या व्यक्तीसाठी स्वतःला बदलणं योग्य नाही. मात्र, अक्षय कुमारसोबतच्या एका भेटीमुळे तिचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला होता.

मृणालने तिच्याच आत्मविश्वास निर्माण होण्याचं श्रेय अभिनेता अक्षय कुमारला दिलं. त्याचा सल्ला आठवत ती म्हणाली,"मी अक्षय सरांना भेटले तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं ते वाक्य खूप सुंदर होतं. ते मला म्हणाले,'तू स्वतःला जशी आहेस तसंच स्विकारलंस याचा मला खूप आनंद आहे. तुझ्या सभोवतालचे लोक जे तुझं लक्ष विचलित करतात किंवा तुला हजारो गोष्टी सांगतात... त्याकडे तू लक्ष देत नाहीस आणि तुला जे वाटतं ते तू करतेस हे खूप छान आहे. एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी करणं ठीक आहे, पण एखाद्याच्या टोमण्यांमुळे स्वतःला बदलणं ठीक नाही." अक्षय कुमारच्या त्या शब्दांनी तिच्यावर मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे कोणाच्याही दबावापेक्षा स्वत:साठी चांगलं आणि वाईट काय हे निवडण्याचा आत्मविश्वास दिला.

Web Title : मृणाल ठाकुर को बॉडी शेमिंग का सामना करना पड़ा, अक्षय कुमार की सलाह ने बदला नज़रिया।

Web Summary : मृणाल ठाकुर ने खुलासा किया कि उन्हें अपने करियर की शुरुआत में बॉडी शेमिंग का सामना करना पड़ा। अक्षय कुमार की खुद को स्वीकार करने की सलाह ने उन्हें आलोचना को अनदेखा करने और आत्मविश्वास बढ़ाने में मदद की। अब वह दूसरों की राय से ज्यादा अपनी भलाई को प्राथमिकता देती हैं।

Web Title : Mrunal Thakur faced body shaming, Akshay Kumar's advice changed her.

Web Summary : Mrunal Thakur revealed she faced body shaming early in her career. Akshay Kumar's advice to accept herself helped her ignore criticism and boosted her confidence. She now prioritizes her well-being over others' opinions.