इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:45 IST2024-04-27T16:44:20+5:302024-04-27T16:45:06+5:30

मृणालने 'जर्सी', 'लस्ट स्टोरीज 2', 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. सुरुवातीला मृणालला इंटिमेट सीन्समुळे सिनेमांना नकार द्यावा लागला होता.

Mrunal Thakur dropped many movies due to intimate scenes involved in it her parents didnt approve to do it | इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

अभिनेत्री मृणाल ठाकुरचं (Mrunal Thakur) करिअर सध्या चांगलंच जोरात आहे. 'सीतारामम' सिनेमाच्या यशानंतर ती अनेक सिनेमांमध्ये दिसली. तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे प्रेक्षक चाहते झाले. मृणालने 'जर्सी', 'लस्ट स्टोरीज 2', 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. सुरुवातीला मृणालला इंटिमेट सीन्समुळे सिनेमांना नकार द्यावा लागला होता. कारण तिच्या आईवडिलांनी तिला पडद्यावर किसींग सीन करण्याची परवानगी दिली नव्हती असा तिने नुकताच खुलासा केला.

एका मुलाखतीत मृणाल म्हणाली, "सुरुवातीला मी इंटिमेट सीन्स करण्यासाठी अजिबातच कंफर्टेबल नसायचे.  मला असे सीन्स करायला घरुनही विरोध होता. मी सरळ सिनेमा नाकारायचे. पण मग मलाच वाटायला लागलं की असं कधीपर्यंत मी सिनेमा सोडणार आहे. मग एके दिवशी मी आईवडिलांजवळ बसले आणि त्यांना म्हणाले की आईबाबा, काही वेळा सिनेमात असे सीन्स द्यावे लागतात. या एका कारणाने मी भूमिका गमावू शकत नाही."

ती पुढे म्हणाली, "मला कितीही सिनेमा करण्याची इच्छा असली तरी फक्त किसींग सीन्समुळे मला नकार द्यावा लागायचा. एक कलाकार म्हणून तुम्ही कधीही तयार असले पाहिजे कारण कधीकधी हीच सिनेमाची मागणी असते. तुम्ही जर कंफर्टेंबल नसाल तर तसं तुम्ही सरळं सांगू शकता पण मी असं न केल्याने अनेक चित्रपट हातचे सोडले."

मृणाल ठाकूरचा 'द फॅमिली स्टार' सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. यामध्ये विजय देवरकोंडासोबत तिची जोडी होती. तिचे आगामी दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमे येणार आहेत. यामध्ये 'पूजा मेरी जान'चाही समावेश आहे. हुमा कुरेशीही सिनेमात झळकणार आहे.

Web Title: Mrunal Thakur dropped many movies due to intimate scenes involved in it her parents didnt approve to do it