मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 11:50 IST2024-02-21T11:49:13+5:302024-02-21T11:50:45+5:30

mrunal thakur: कंगनाच्या वडिलांचं घर झालं मृणाल ठाकूरच्या नावावर; या घरासाठी मृणालने तिची सगळी जमापुंजी खर्च केली आहे.

mrunal-thakur-and-her-father-have-bought-two-apartments-from-kangana-ranaut-family-in-mumbai | मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

मृणाल ठाकूरने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर; 2 अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल इतके कोटी रुपये

बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (mrunal thakur). छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणालने इंडस्ट्रीमध्ये तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात कायम तिच्या नावाची चर्चा रंगत असते. मृणाल तिच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. यात नुकतंच तिने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं असून हे घर अभिनेत्री कंगना रणौतच्या (kangana ranaut) वडिलांचं आहे.
अल्पावधीत मृणालने कलाविश्वात तिचा चांगला जम बसवला आहे. त्यामुळे सध्या ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यामध्येच मृणालने मुंबईतील अंधेरी वेस्ट या भागात तिचं हक्काचं घर खरेदी केलं आहे. या घरासाठी तिने प्रचंड मोठी रक्कम मोजल्याचंही सांगण्यात येत आहे.

मृणालने खरेदी केलं कंगनाच्या वडिलांचं घर

मृणालने मुंबईत एक नव्हे तर २ अपार्टमेंट खरेदी केले आहेत. यापैकी एक अपार्टमेंट कंगनाच्या वडिलांचं आहे. तर, दुसरं अपार्टमेंट तिच्या भावाचं आहे. मृणालने २५ जानेवारी २०२४ मध्ये या घरांसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.

कोटींच्या घरात केली मृणालने घरांची खरेदी

मृणालने तब्बल १० कोटी रुपयांना हे दोन्ही अपार्टमेंट खरेदी केले आहेत. यात पहिलं अपार्टमेंट ९४.४६ वर्ग मीटर असून त्यासाठी तिने ३० लाख रुपयांचं स्टॅम्प ड्युटी  केलं आहे. तर, दुसरं अपार्टमेंट ९२.६६ वर्ग मीटर असून यासाछीबी ३० लाख रुपयांचं स्टॅम्प ड्युटी भरला आहे.

दरम्यान, मृणाल बॉलिवूडसह दाक्षिणात्य कलाविश्वातही सक्रीय आहे. 'मुझसे कुछ कहती..ये खामोशियाँ' आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांमधून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर लव सोनिया या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१९ मध्ये ती 'सुपर 30', 'बाटला हाऊस' या सिनेमांमध्ये झळकली.

Web Title: mrunal-thakur-and-her-father-have-bought-two-apartments-from-kangana-ranaut-family-in-mumbai