शरत सक्सेना यांच्या फिटनेसपुढे सलमान-जॉन झाले फेल; 72 व्या वर्षी अभिनेत्याची बॉडी पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 17:01 IST2023-05-05T17:00:54+5:302023-05-05T17:01:22+5:30
Sharat saxena: शरत बऱ्याचदा चाहत्यांसोबत त्यांच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे यात त्यांचा दिसणारा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे.

शरत सक्सेना यांच्या फिटनेसपुढे सलमान-जॉन झाले फेल; 72 व्या वर्षी अभिनेत्याची बॉडी पाहून व्हाल थक्क
Sharat Saxena Age: बॉलिवूड अभिनेता शरत सक्सेना यांना कोणी ओळख नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती सापडले. शरत सक्सेना यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील त्यांची डागा ही खलनायिकी भूमिका विशेष गाजली होती. शरत सक्सेना यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला असून अलिकडेच त्यांचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ते सक्रीय आहे. शरत सक्सेना 72 वर्षांचे असून त्यांचा फिटनेस हृतिक, सलमानला लाजवेल असाच आहे.
आपल्या दमदार अभिनयाने ९० चा काळ गाजवणारे शरत सक्सेना यांचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील सोशल मीडियावर ते चांगलेच सक्रीय आहे. इतकंच नाही तर वयाच्या 72 व्या वर्षीही त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या फिटनेसची जोरदार चर्चा होत असते.
शरत बऱ्याचदा चाहत्यांसोबत त्यांच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे यात त्यांचा दिसणारा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. त्यांच्या समोर सलमान खान, जॉन अब्राहमदेखील फेल असल्याचं अनेक चाहते म्हणतात.
दरम्यान, शरत यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले. यात ऐतबार, मुजरिम, नन्हें जैसलमर, गुलाम, मिस्टर इंडिया, तुमको ना भूल पाएंगे, फिर हेरा फेरी, बजरंगी भाईजान, भागम भाग या सिनेमात काम केलं आहे. शरत विद्या बालनच्या शेरनी या सिनेमात अखेरचे झळकले होते.