कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 13:03 IST2021-11-25T13:01:36+5:302021-11-25T13:03:58+5:30
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : असा आहे प्लॅन; पहिल्यांदा कोर्ट मॅरेज नंतर बांधणार विधिवत लग्नगाठ

कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नात पाहुणे येणार, पण ‘चेकिंग’ होणार! वाचा अपडेट्स
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची चर्चा जोरात आहे आणि या लग्नाचं प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण कतरिना व विकीचं आधीच ठरलंय म्हणे. त्यांना लग्नाचा बोभाटा नकोय. अगदी काही मोजक्यांच्या उपस्थितीत दोघांनाही एक खासगी सोहळा हवा आहे. या लग्नासाठी पुढील आठवड्याचा मुहूर्त पक्का झाल्याची खबर आहे.
राजस्थानातील सवाई माधोपूरमध्ये कॅट व विकीच्या लग्नाची भव्य तयारी सुरू आहे. पण त्याआधी मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा दोघांचा प्लान आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहे. लग्नाचा अख्खा सोहळा अतिशय पर्सनल व सीक्रेट राहावा, यासाठी अनेक प्रकारची तयारी करण्यात आली आहे.
नो मोबाईल, नो व्हिडीओ!!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचा एकही फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक होऊ नये, यासाठी कॅट व विकीनं जय्यत तयारी केली आहे. अगदी लग्नासाठी येणाºया पाहुण्यांचीही चेकिंग होणार आहे. कोणालाही आतमध्ये मोबाईल सोबत नेण्याची परवानगी नसेल. वेडिंग वेन्यूवर एका खास ठिकाणी सर्व पाहुण्यांचे मोबाईल जमा केले जाणार आहेत. यातून कोणालाही सवलत दिली जाणार नाही.
विकी व कतरिनाच्या लग्नात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी. अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, वरूण धवन-नताशा अशा अनेकांची नावं गेस्ट लिस्टमध्ये असल्याचं कळतंय. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबालाही या लग्नाला हजेरी लावणार, अशी चर्चा आधी होती. पण बिझी शेड्यूलमुळे कदाचित भाईजान या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही, असं कळतंय.