मीसेस उपमुख्यमंत्र्यांचा ग्लॅमरस लूक चर्चेत, 'मिस वर्ल्ड २०२४' च्या महाअंतिम सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी वेधलं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 11:02 IST2024-03-10T11:00:53+5:302024-03-10T11:02:25+5:30

तब्बल २८ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड २०२४'चा महाअंतिम सोहळा आज भारतात पार पडला

Miss World 2024 Final Competition Amruta Fadnavis Judges For This Years Edition | मीसेस उपमुख्यमंत्र्यांचा ग्लॅमरस लूक चर्चेत, 'मिस वर्ल्ड २०२४' च्या महाअंतिम सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी वेधलं लक्ष!

'मिस वर्ल्ड २०२४' च्या महाअंतिम सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी वेधलं लक्ष!

'मिस वर्ल्ड 2024' चं तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजन करण्यात आलं होतं.  ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा आज (९ मार्च) भारतात पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने 'मिस वर्ल्ड २०२४' चा किताब पटकावला (Miss world 2024 Krystyna Pyszkova). मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे विविध व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. 

अमृता फडणवीस यांनी सोंदर्यवतींच्या सोहळ्यात हजेरी लावली होती. स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी त्या पोहचल्या होत्या. 'मिस वर्ल्ड 2024' या स्पर्धेच्या परीक्षणसाठी १२ सदस्याचं पॅनेल होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. या सदस्यांनी 'मिस वर्ल्ड २०२४' चं परीक्षण केलं.

 

'मिस वर्ल्ड 2024' या सोहळ्यात अमृता फडणवीस या निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसून आल्या. यावेळी त्यांनी बोल्ड मेकअप आणि मोकळे केस असा लूक पुर्ण केला होता. यात त्या अगदी गॅल्मरस दिसत होत्या. त्यांचा हटके लूक चर्चेत आला आहे. या लूकमधील त्यांच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी पापराझींना त्यांनी एखाद्या मॉडेलप्रमाणे फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. त्यांच्या या फॅशन सेन्स आणि मॉर्डन लूकपुढे भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील. अमृता यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अमृता फडणवीस पेशाने बँकर असून गायिकाही आहेत. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा त्या त्यांचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसतात. अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थिती दर्शवतात. त्यांच्या कामाबरोबरच फॅशनमुळेही अनेकदा अमृता फडणवीस चर्चेत असतात. अमृता फडणवीस अनेकदा त्यांचे फोटोही शेअर करताना दिसतात.
 

Web Title: Miss World 2024 Final Competition Amruta Fadnavis Judges For This Years Edition